शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी अग्निशमन कर्मचारी कामावर परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:00 IST

नगर परिषदेत मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या एजंसीच्या माध्यमातून अग्निशमन विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाºयांना मागील १०-१२ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. अशात त्यांना आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत असल्याने १३ कर्मचाऱ्यांनी १ ऑगस्टपासून कामबंद केले होते. त्यांच्या या पवित्र्यानंतर मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी संबंधित कंत्राटदाराला १३ लाख रूपयांचे अनुदान दिल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देदोन महिन्याचे वेतन मिळाले : पगार काढून देण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कंत्राटदाराकडून दोन महिन्याचा पगार मिळाल्यानंतर आणि मुख्याधिकाऱ्यांनी १५-१५ दिवसांत पगार काढून लवकरात लवकर पूर्ण पगार करून देण्याच्या आश्वासनानंतर अखेर येथील अग्निशमन विभागातील कंत्राटी कर्मचारी शुक्रवारी (दि.७) दुपारी ३वाजतापासून कामावर परतले.नगर परिषदेत मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या एजंसीच्या माध्यमातून अग्निशमन विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील १०-१२ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. अशात त्यांना आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत असल्याने १३ कर्मचाऱ्यांनी १ ऑगस्टपासून कामबंद केले होते. त्यांच्या या पवित्र्यानंतर मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी संबंधित कंत्राटदाराला १३ लाख रूपयांचे अनुदान दिल्याची माहिती आहे. मात्र कंत्राटदार या कर्मचाऱ्यांना फक्त २ महिन्यांचे पगार देणार असे सांगत होता. त्यामुळे कर्मचाºयांनी याचा विरोध केला व शुक्रवारी (दि.७) मुख्याधिकारी चव्हाण यांची भेट घेतली. चव्हाण यांनी कंत्राटदारास बोलावून घेतले व कर्मचाºयांच्या हाती २ महिन्यांचा पगार दिला.तसेच १५-१५ दिवसांतून पगार काढून थकलेला पूर्ण पगार काढून देण्याचे आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांना लगेच कामावर रूजू होण्यास सांगीतले. त्यानुसार, कर्मचारी शुक्रवारी दुपारी ३ वाजता कामावर रूजू होणार होते. विशेष म्हणजे, हे कंत्राटी कर्मचारी सुटीवर गेल्याने अग्निशमन विभागात कार्यरत स्थायी व रोजंदारी कर्मचाऱ्यांची चांगलीच अडचण झाली असून त्यांना १२-१२ तासांची ड्यूटी करावी लागत असल्याची माहिती आहे.सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्न ही मार्गी लागणारमुख्याधिकारी चव्हाण यांनी अग्निशमन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देत त्यांना कामावर रूजू करुन घेतले. एजंसीच्या माध्यमातून नगर परिषदेतील सफाई व अन्य विभागांत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचेही कित्येक महिन्यांचे पगार थकले आहेत. अशात मात्र त्यांचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना देणार असून हा संपूर्ण विषयच मार्गी लावणार असे मुख्याधिकारी चव्हाण यांनी सांगीतले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका