शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सभागृहाची अवमानना व अधिकाऱ्यांची दिशाभूल

By admin | Updated: December 3, 2015 02:12 IST

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयावर तत्काळ कारवाई करण्याचे अधिकार विभागप्रमुख आणि अधिनस्थ सहायकांना असतात.

शिक्षक माने निलंबन प्रकरण : वरिष्ठ सहायकावर कारवाई करागोंदिया : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयावर तत्काळ कारवाई करण्याचे अधिकार विभागप्रमुख आणि अधिनस्थ सहायकांना असतात. मात्र विभागप्रमुख आणि सहायक सभागृहाची अवमानना व अधिकाऱ्याची दिशाभूल कशी करतात, हे जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागात कार्यरत वरिष्ठ सहायक खांडवाहेच्या भेटीदरम्यान दिसून आल्याचे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.तिरोडा तालुक्यातील जि.प. शाळा बेरडीपार येथील शिक्षक नेतराम माने यांना सेवा शिस्त नियमाची उधळपट्टी करुन निलंबित केले. हे प्रकरण २ नोव्हेंबरला जि.प.च्या सर्व साधारण सभेत मनोज डोंगरे, सुरेश हर्षे आणि गंगाधर परशुरामकर यांनी उचलून धरले. नियम, पुरावे देण्यात आले. यावेळी रामटेके, विश्वजित डोंगरे आणि भक्तवर्ती यांच्यासह इतरांनी समर्थन केले. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी पाडवी यांनी रिईस्टे करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले होते.शिक्षण विभागाने रिईस्टेची टिपनी साप्रविकडे पाठविण्यात आल्याचे माहीत झाल्याने (दि.२४) आपण सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम यांना भेटायला गेलो. मात्र उपस्थित नसल्याने वरिष्ठ सहायक खांडवाहे यांची भेट घेऊन निलंबित शिक्षक नेतराम मानेच्या प्रकरणाचा काय करण्यात आला, अशी विचारणा करताच खांडवाहे यांनी त्या शिक्षकबद्दल धमकावत उडवाउडवीचीे आणि दिशाभूल करणारे उत्तरे दिली, असे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी सांगितले. तसेच सभागृहात ठरल्यानंतर या सहायकाला अन्य कारणे सांगण्याचे कारण काय? सभागृहाला ग्राह्य धरण्यात येत नसेल तर जि.प.च्या मिनी मंत्रालय सभागृहाला आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अर्थ काय? असा सवालही उपस्थित केला आहे.संपूर्ण जि.प. मध्ये विविध विभागातील कक्ष अधिकारी, अधीक्षक आणि कनिष्ठ व वरिष्ठ सहायक दिशाभूल करुन फसवणूक करतात. तसेच तेथे गोरखधंदा सुरु असल्याचेही डोंगरे यांनी सांगितले आहे. माने शिक्षकाचे निलंबन पूर्णत: चुकीने करण्यात आले. यात मुख्य कार्यपालन अधिकारी यांची दिशाभूल करुन पुरावे व वास्तव लपविण्यात आले. तरीदेखील वरिष्ठ सहायक खांडवाहे म्हणतो, कारवाई बरोबर करण्यात आली. डोंगरे यांनी सांगितले, आपण प्रकरणाची शहनिशा केली आणि पुरावे तपासले. त्यात कारवाई चुकीची असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.वरिष्ठ सहायक खांडवाहे यांच्यानुसार, रितसर पुरावे आणि सेवा-शिस्त नियमांचा पालन केला नसल्याची विचारणा मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांमार्फत करणार असल्याचेही डोंगरे यांनी सांगितले. वरिष्ठ सहायक खांडेवाहे शिक्षण विभागात कार्यरत असताना पी.एच. लाळे प्रकरण दडपून शिक्षक माने यांनी न्यायालयात धाव घेण्याची परवानगी व वृत्तपत्रात संकलनाची परवानगी संबंधात दिलेल्या पत्रावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टिप्पणी तयार करण्याचे सुचविले असताना खांडेवाहे यांनी प्रकरणे लपवून अधिकाऱ्यांची दिशाभूल केली असल्याचे पुराव्यावरुन स्पष्ट दिसून येत आहे.सभागृह, न्यायालय, मुख्य कार्यपालन अधिकारी, विभागप्रमुख यांची दिशाभूल करणाऱ्या तसेच पदाधिकाऱ्यांशी असभ्य वर्तणूक आणि दिशाभूल करीत अवमानना करणाऱ्या शिक्षण विभाग व सामान्य प्रशासन विभागामधील वरिष्ठ सहायक खांडवाहे याच्यावर कारवाई करण्याची मागणी जि.प. सदस्य डोंगरे यांनी केली. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.न्यायालयाची बाब वरिष्ठ सहायकाने लपविलीन्यायप्रविष्ट प्रकरण न्यायालयाच्या कक्षेत असल्याने निर्णयापर्यंत त्या विषयाशी किंवा हस्तक्षेप करणे न्यायालयाची अवमानना सहायक खांडवाहे आणि शिक्षण विभागाने केली आहे. वरिष्ठ सहायक खांडवाहे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम यांना न्यायप्रविष्ट बाब आणि बेलची माहिती न देता लपविली आहे.उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी खडसावलेजि.प. सदस्य डोंगरे आपल्या सहकाऱ्यासोबत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एल.आर. पुराम यांची भेट घेतली. निलंबित शिक्षक एन.एल. माने यांच्या कारवाईबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला आणि संबंधित सहायक खांडवाहे यांची तक्रार केली. याचवेळी पुराम यांनी खांडेवाहेला बोलावून तात्काळ जी.बी. मध्ये ठरल्याप्रमाणे कारवाई करुन प्रस्ताव समक्ष सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरण लांबवित असल्याप्रकरणी या सहायकाला चांगलेच खडसावले असल्याचे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी सांगितले.