शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात होणार १३ हजार शौचालयांचे बांधकाम

By admin | Updated: October 9, 2014 23:04 IST

देशातील ग्रामीण भागांना हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. सन २०१४ च्या शेवटपर्यंत जिल्ह्याला हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात १३ हजारपेक्षा अधिक शौचालयांच्या

गोंदिया : देशातील ग्रामीण भागांना हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. सन २०१४ च्या शेवटपर्यंत जिल्ह्याला हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात १३ हजारपेक्षा अधिक शौचालयांच्या बांधकामांना सुरूवात झालेली आहे. यासाठी ५१ गावांची निवड सन २०१३-१४ मध्ये करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातून देण्यात आली आहे.गावांच्या विकासावरच देशाचा विकास निर्भर आहे. परंतु ग्रामीण भागात शासनाच्या योजना विलंबाने पोहचत असल्यामुळे गावकरी वेळेवर त्या योजनांचा लाभ घेवू शकत नाही. ग्रामीण भागात ६० टक्के नागरिक उघड्या परिसरात शौचविधीसाठी जातात. त्याच परिसरात खताचे खड्डे खोदून जनावरांचे मलमूत्र संग्रहीत केले जाते. त्यामुळे तेथे पिण्याचे पाणी दूषित होते. दूषित पाणी पिण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होवू लागतो. या प्रकारामुळेच अधिक प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होतो. या बाबीला गांभीर्याने घेवून शासनाद्वारे गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प घेत निर्मल भारत अभियानाची योजना अमलात आणण्यात आली. सदर योजनेंतर्गत लाभार्थी गावांची निवड करून त्या गावांत शौचालयांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील ५१ गावांना १३ हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम देवून शौचालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या अभियानाची सुरूवात करून सन २०१४ च्या शेवटपर्यंत शौचालयांचे बांधकाम केले जाईल. सदर अभियानाची सुरूवात एप्रिल २०१२ पासून करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत सन २०२२ पर्यंत देश हागणदारीमुक्त होईल. त्यासाठी निर्मल भारत अभियानाच्या वतीने कार्यांना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शौचालयांचा लाभ दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणारेच नव्हे तर इतर महिला परिवार प्रमुख, अपंग कुटूंब प्रमुख, भूमिहिन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, अनुसूचित जाती व जमातीमधील लाभार्थी निवडीचे कार्य केले जाईल.