शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता एसटीचे केले जातेय वारंवार सॅनिटाईजेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 05:00 IST

आता राज्यातील स्थिती नियंत्रणात येत असल्याचे बघून राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात केली आहे. परिणामी एसटी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली असून हळूवारपणे तिला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आगारांकडून एसटीची धुलाई व सॅनिटाईजेशन केले जात आहे. प्रत्येक फेरीनंतर एसटी आगारात येताच तिची धुलाई व सॅनिटाईजेशन केले जात आहे, हे विशेष. 

ठळक मुद्देलालपरी निघाली स्थानकाबाहेर : प्रत्येक फेरीनंतर धुलाई व सॅनिटाईजेशन

­लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन करावा लागला होता व त्यामुळे सर्वच काही ठप्प पडले होते. याचा फटका राज्य रस्ते परिवहन महामंडळालाही दुसऱ्यांदा सहन करावा लागला असून महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यात जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा या आगारांचाही समावेश असून या दोन्ही आगारात एसटी मागील सुमारे दीड महिन्यापासून स्थानकातच उभ्या होत्या. परिणामी दोन्ही आगार कोट्यवधींच्या नुकसानीत गेले आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांनी घराबाहेर निघणे टाळले, त्यात प्रवास पूर्णपणे बंद होता. यामुळे एसटी स्थानकात प्रवाशांची वाट बघत उभी राहिली. आता राज्यातील स्थिती नियंत्रणात येत असल्याचे बघून राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात केली आहे. परिणामी एसटी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली असून हळूवारपणे तिला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आगारांकडून एसटीची धुलाई व सॅनिटाईजेशन केले जात आहे. प्रत्येक फेरीनंतर एसटी आगारात येताच तिची धुलाई व सॅनिटाईजेशन केले जात आहे, हे विशेष. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे बाहेरगावी ये-जा सुरु झाली आहे. त्यामुळे बससेस मध्ये सुध्दा आता हळूहळू प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र महामंडळांची आर्थिक गाडी अद्यापही रुळावर आली नसल्याने चिंता कायम आहे. 

प्रत्येक फेरीनंतर एसटीचे सॅनिटाईजेशन - एसटीचा प्रवास सुरू झाला असून प्रवाशांचा हळूवार प्रतिसाद मिळत आहे. अशात आगारांकडून प्रवासी सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. यासाठी प्रत्येक फेरीनंतर एसटीची धुलाई  व सॅनिटाईजेशन केले जात आहे. चालक-वाहकांना मास्क बंधनकारक असतानाच प्रवाशांनाही मास्क घालूनच प्रवेश दिला जात आहे. प्रवाशांचा प्रवास सुखद व्हावा असे असतानाच ते सुरक्षित रहावे याकडेही आगारांकडून लक्ष दिले जात आहे.  

सुमारे ५ कोटींचा झाला तोटा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन करावा लागला असून याचा फटका आगारांना चांगलाच बसला आहे. मागील सुमारे दीड महिन्यापासून एसटी स्थानकातच उभी असल्याने गोंदिया आगाराचे या काळात सुमारे ३.५० कोटींचे तर तिरोडा आगाराचेही सुमारे १.५० कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी प्रवास पूर्णपणे टाळला मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड जीवहानी केली आहे. जिल्ह्यातील ती परिस्थिती बघता आता नागरिकांत दहशत बसली आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर निघणे टाळल्याचेही दिसत आहे. अशात नागरिकांनी प्रवासावर पूर्णपणे बंदीच घातली आहे. परिणामी एसटी स्थानकात तयार उभी असतानाही प्रवासी नसल्याने तिला तसेच उभे रहावे लागत असल्याचे दिसले. आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने कामानिमित्त नागरिकांनी बाहेर पडण्यास सुरूवात केली असून थोडाफार प्रतिसाद मिळत आहे. 

नागपूर मार्गावर सर्वाधिक वाहतूक - गोंदिया आगारातील सर्वाधिक फेऱ्या नागपूर मार्गावर धावतात. नागपूर मार्गावर मधात भंडारा जिल्हा येत असून त्यानंतर नागपूर येते. जिल्हा निर्मितीपूर्वी गोंदिया भंडारा जिल्ह्यातच होता व आजही कित्येक कार्यालयांचा कारभार भंडारा येथूनच चालतो. तसेच नागपूर येथे बहुतांश विभागांचे मुख्य कार्यालय असून याशिवाय शिक्षण, उपचार, खरेदी व कार्यालयीन कामकाजासाठी नागरिकांना नागपूर येथे जावे लागते. तसेच अपडाऊन करणारे कर्मचारीही असल्याने वर्षभर या मार्गावर वाहतूक असते. तिरोडा आगाराच्या एसटीही नागपूर तसेच गोंदिया मार्गावर धावत आहेत. 

लालपरी रस्त्यावर निघाल्याने दिलासा 

मागील सुमारे दीड महिन्यापासून लालपरी स्थानकातच होती. यामुळे आगाराचे प्रचंड नुकसान झाले आहे. या लालपरीवरच आमचा उदरनिर्वाह असून आता लालपरी पुन्हा रस्त्यावर निघाल्याने आनंद होत आहे. आमची ड्यूटी पुन्हा सुरू झाली असून आता पगाराचीही समस्या सुटणार. - अरूण तुरकर (चालक) लॉकडाऊनमुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मागील वर्षी सुद्धा हीच स्थिती निर्माण झाली होती. एसटी स्थानकातच उभी राहत असल्याने बरे वाटत नव्हते. आता एसटी पुन्हा रस्त्यावर उतरली असून तिचा प्रवास करता येणार आहे. उत्पन्न येणार असल्याने पगाराचा प्रश्नही सुटणार. - श्यामा मेश्राम (वाहक)

 

टॅग्स :state transportएसटीcorona virusकोरोना वायरस बातम्या