शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

चिखलमय रस्त्यांमुळे तुटला गावांचा संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:01 IST

ट्रॅक्टर चिखल मातीसह रस्त्यावर काढले जात असल्याने चौरसातील सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. सदरच्या चिखलमय रस्त्यावरून पावसात ये जा करणाऱ्या वाहनधारक नागरिकांत अपघाताची भीती निर्माण झाली आहे. चौरास भागातील चिखलमय रस्त्यांनी अनेक गावाचा संपर्क तुटल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनागरिकांत अपघाताची भीती : जीव मुठीत घेऊन रहदारी

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शेतात रोवणीसाठी ट्रॅक्टरने चिखलणी करतानाच चिखलाने माखलेले ट्रॅक्टर चिखल मातीसह रस्त्यावर काढले जात असल्याने चौरसातील सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. सदरच्या चिखलमय रस्त्यावरून पावसात ये जा करणाऱ्या वाहनधारक नागरिकांत अपघाताची भीती निर्माण झाली आहे. चौरास भागातील चिखलमय रस्त्यांनी अनेक गावाचा संपर्क तुटल्याचे चित्र आहे.लाखांदूर तालुक्यातील विशेषत: चौरास भागात धानपीक रोवणीला वेग आला आहे. धान रोवणीसाठी चिखलणी साठी या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर करतात.शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून या भागात डांबरीकरणाच्या रस्त्यांचे बांधकाम केले असले तरी पावसाळ्याच्या दिवसात ट्रॅक्टरने शेतातून येणाऱ्या चिखलमाती मुळे संबंधित रस्ते अवघ्या वर्षभरातच खड्डेमय होत असल्याची वास्तविकता आहे. याचा सर्वाधिक फटका गाव परिसरातील नागरिकांना रहदारीदरम्यान सहन करावा लागत असतो.या सबंध गैरप्रकाराची माहिती स्थानिक प्रशासनासह बांधकाम विभाग व वाहतूक नियंत्रण विभागाला असली तरी संबंधितांकडून हेतूपुरस्पर डोळेझाक केली जात असल्याचा आरोपही नागरिकांफर्ते केला जात आहे.चिखलमय रस्ते होताना वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन गावांचा संपर्क तुटल्याने चौरसातील जनतेत नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन शेतातून ट्रॅक्टरने चिखल माती सह रस्त्यावर येणाºया वाहन चालका विरोधात कार्यवाही करावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.चिखलणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित ट्रॅक्टर चिखल मातीने भरलेल्या अवस्थेतच रस्त्यावर काढले जात असल्याने ट्रॅक्टरच्या चाकांना असलेले चिखल माती रस्त्यावर पडून पावसात अपघाताची भीती निर्माण झाली आहे. साधारण पावसात या भागातील रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहनाने ये-जा करणे धोकादायक ठरत असल्याने चिखलमय रस्त्यांमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा