कोरोना लढ्यासाठीच्या साहित्य खरेदीत घोळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 05:00 AM2020-09-29T05:00:00+5:302020-09-29T05:00:26+5:30

काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने टेबलेट सॅनिटायजर मशीन ७०० ते १००० मिली खरेदीचे कंत्राट नागपूरच्याच कंपनीला दिले. ही मशीन बाजारात दोन-तीन हजार रूपयांना मिळत असताना सहा हजार ८०० रूपयांप्रमाणे सहा लाख १२ हजार रुपयांच्या मशीन खरेदी करण्यात आल्या. यात १२ पुरवठादारांनी भाग घेतला होता. परंतु नागपुरातील त्या ४ कपन्यांपैकी एका कंपनीला हे कंत्राट देण्यात आले.

Confusion in the purchase of corona fighting equipment? | कोरोना लढ्यासाठीच्या साहित्य खरेदीत घोळ?

कोरोना लढ्यासाठीच्या साहित्य खरेदीत घोळ?

Next
ठळक मुद्देसर्व कंत्राट नागपूरच्याच नावाने : दुप्पट किंमतीत अनेक साहित्य खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेम या ऑनलाईन अ‍ॅपवरून निविदा मागविल्या होत्या. परंतु गोंदिया जिल्ह्यातील कोणत्याही कंत्राटदाराला याचे काम मिळू नये म्हणून आरोग्य विभागाने जाचक अटी लादल्या. परिणामी हेतूपुरस्सर नागपूर येथील ४ कंपन्यांना हे साहित्य पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले. यात अधिकाऱ्यांचे हात ओले झाल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने टेबलेट सॅनिटायजर मशीन ७०० ते १००० मिली खरेदीचे कंत्राट नागपूरच्याच कंपनीला दिले. ही मशीन बाजारात दोन-तीन हजार रूपयांना मिळत असताना सहा हजार ८०० रूपयांप्रमाणे सहा लाख १२ हजार रुपयांच्या मशीन खरेदी करण्यात आल्या. यात १२ पुरवठादारांनी भाग घेतला होता. परंतु नागपुरातील त्या ४ कपन्यांपैकी एका कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. व्हीटीएम किट स्वाईन फ्यू करीता स्वॉब घेण्यासाठी लागणाºया २५ हजार किटचा पुरवठा करण्याचे कंत्राट नागपूर येथील ४ पैकी एका कंपनीलाच देण्यात आले. बाजारात ७० ते ८० रूपयांना मिळणारी ही किट १४४ रूपये प्रति दराने खरेदी करण्यात आली. यात १५ लोकांनी निविदा भरल्या होत्या. परंतु नागपूरच्याच कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले. ३६ लाखात या किट खरेदी करण्यात आल्या.
इन्फ्रारेड थर्मामीटर १२९९ नग पुरवठयाचे कंत्राट सुद्धा नागपूरच्याच कंपनीला देण्यात आले. यात २३ लोकांनी निविदा भरल्या होत्या. बाजारात ८०० ते ९०० रूपये किंमतीला मिळणारे हे इन्फ्रारेड थर्मामीटर २६०० रूपये प्रति नग प्रमाणे खरेदी करण्यात आले. त्यावर ३३ लाख ७७ हजार ४०० रूपये खर्च करण्यात आले. पल्स ऑक्सीमीटर १३७९ नग पुरवठा करण्याचे कंत्राट नागपूरच्या कंपनीला देण्यात आले.
आठ लाख १३ हजार ६०० रूपयाचे हे पल्स आॅक्सीमीटर खरेदी करण्यात आले.
एक पल्स ऑक्सीमीटर ५९० रूपयांना पडला आहे. यात मोठ्या प्रमाणात रक्कम कमविण्याच्या नादात तर नागपूरच्या कंपन्यांना साहित्य पुरवठा करण्याचे कंत्राट तर दिले नाही ना अशी चर्चा आहे.

साहित्यासाठी ५ वर्षांचा अनुभव कशाला?
स्थानिकांना डावलून नागपूरच्याच कंपन्यांना कंत्राट देणे ही बाब आरोग्य विभागावर संशय निर्माण करणारी आहे. हे साहित्य पुरवठा करताना मागील ५ वर्षांचा अनुभव मागणे हे चुकीचे आहे. साहित्य पुरविण्यासाठी शासकीय कार्यालयांना ५ वर्षांचा अनुभव असावा ही अट म्हणजे जाणून बुजून जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला याचा कंत्राट मिळू नये यासाठी पद्धतशिरपणे करण्यात आलेला हा कट असल्याचे बोलले जात आहे.


‘त्या’ औषध निर्माण अधिकाऱ्याची दलाली
४गोंदिया जिल्हा परिषदेत असलेल्या एका औषध निर्माण अधिकाऱ्याच्या आयडीवरून नागपूर येथील त्या ४ कंत्राटदारांच्या निविदा अनेकदा भरण्यात आल्या आहेत. तीन लाखांपेक्षा कमी कामांची निविदाही प्रकाशित करावी लागत नाही. त्यासाठी तीन लाखांपेक्षा कमी कामे याच कंपन्यांना यापूर्वीही देण्यात आली आहेत. ती सर्व कामे त्या औषध निर्माण अधिकाऱ्याच्या आयडीवरून करण्यात आली. याचाच अर्थ त्या औषध निर्माण अधिकाऱ्याची त्या कंपन्यांसोबत साठगाठ आहे असे आता बोलले जात आहे.

सॅनिटायजर मशीनचे कंत्राट देण्यात आले. उर्वरीत साहित्याचे आदेश अद्याप देण्यात आले नाही. नियमाप्रमाणेच ज्यांचे कमी दर होते त्यांनाच कंत्राट देण्यात आले. मागितलेल्या कागदपत्रांची ज्यांनी पूर्तता केली त्यांच्या नावाने निविदा निघेल.
-डॉ. श्याम निमगडे
जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गोंदिया.

Web Title: Confusion in the purchase of corona fighting equipment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.