शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तडजोडीचे राजकारण सुरू

By admin | Updated: November 11, 2015 01:15 IST

जिल्ह्यातील चार पैकी एकाही नगर पंचायतीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सत्ता स्थापनेसाठी तडजोडीशिवाय पर्याय नाही.

नगर पंचायत : सत्ता स्थापनेसाठी पडद्यामागील हालचालींना जोरगोंदिया : जिल्ह्यातील चार पैकी एकाही नगर पंचायतीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सत्ता स्थापनेसाठी तडजोडीशिवाय पर्याय नाही. अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे या हालचालींना आता वेग आला असून कोण कोणासोबत जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.सडक-अर्जुनीत बाहुबलीची गोचीसडक-अर्जुनी : सडक-अर्जुनी नगर पंचायत अध्यक्षपद अनु.जातीसाठी आरक्षित झाल्यामुळे अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. अनु.जातीचे नगर पंचायतीत चार उमेदवार निवडून आले आहेत. यात राष्ट्रवादीच्या शशिकला विदेश टेंभुर्णे व रिता अजय लांजेवार असून भाजपकडे गिता राजेश शहारे व कॉंग्रेसकडे अजय रामलाल राऊत आहेत. याशिवाय बाहूबली विकास पॅनलचे चार उमेदवार निवडून आले असले तरिही त्यांच्याकडे एकही अनु. जातीचा उमेदवार नाही. त्यामुळे अध्यक्षपदाचे समिकरण ठरविण्यासाठी वेळ लागत आहे. राष्ट्रवादीचे पाच, भाजपचे चार, कॉंग्रेसचे तीन, बाहुबलीचे चार आणि अपक्ष एक असे १७ संख्याबळ आहे. अशात राष्ट्रवादीला बाहूबलीचे समर्थन मिळाल्यास अध्यक्षपदासाठी रिता लांजेवार आणि शशिकला टेंभूर्णे यांच्यापैकी एकाची लॉटरी लागेल. भाजपसोबत एका अपक्षाला घेऊन बाहूबलीचे गठबंधन झाले तर गिता शहारे या नगराध्यक्ष होतील. अभय राऊत कॉंग्रेसचे एकमेव अनु. जातीचे उमेदवार असून कॉंग्रेसचे फक्त तीन सदस्य आहे. कॉंग्रेस जर जोडतोडचे राजकारण करण्यात यशस्वी झाली तर राऊत यांची अध्यक्षपदी वर्णी लागू शकते. तडजोडीच्या राजकारणात सडक-अर्जुनी मागे राहिले नाही. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ््यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजप की काँग्रेस?गोरेगाव : नगर पंचायतमध्ये भाजपचे सहा, कॉंग्रेसचे पाच, अपक्ष चार व राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून आला आहे. मात्र सत्ता स्थापनेसाठी लागणारे नऊ उमेदवार कोणत्याही पक्षाकडे नसल्यामुळे कोणत्याही एका पक्षाला दुसऱ्या पक्षाशी युती करून सत्तेचा उपभोग घेता येईल. आरक्षण सोडतीने गोरेगावात एकदा महिलाराज पहावयास मिळणार आहे. भाजप येथे सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असला तरी भाजपला दोन उमेदवारांशी हातमिळवणी करून सत्ता काबीज करता येईल. मात्र हे समिकरण बसविण्यासाठी भाजपकडे कुठलेही समीकरण नाही. कॉंग्रेस व अपक्ष मिळून कॉंग्रेसने सत्ता काबीज केली तर कॉंग्रेसच्या सीमा कटरे दावेदारी करू शकतात. भाजपच्या उषा रहांगडाले अपक्ष शामली जायस्वाल हे सुद्धा दावेदारीत आघाडीवर आहेत. मात्र कोणत्या पक्षाची कुणाशी युती होईल हे समिकरण स्पष्ट नाही.अपक्षाच्या हाती खेळदेवरी : नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झालेल्या देवरी नगर पंचायत अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडे उमेदवार आहेत. हेच प्रमुख दावेदारही आहेत. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला एक तर भाजपला दोन सदस्यांची गरज आहे. काँग्रेस-भाजपची युती झाली तरी त्यांना एका अपक्षाची गरज भासणार आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारच सत्तेचा खेळ जुळविणार आहे. (जिल्हा/ तालुका प्रतिनिधी)