शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

खासगी आरोग्य क्षेत्रात कमिशनराज

By admin | Updated: April 27, 2016 02:06 IST

आज प्रत्येक क्षेत्रातच कमिशन राज फोफावला असून वैद्यकीय क्षेत्रही आता या पद्धतीने दूषित होऊ लागले आहे.

सर्वसामान्यांची फसगत : या प्रकारावर आळा घालण्याची मागणी रावणवाडी : आज प्रत्येक क्षेत्रातच कमिशन राज फोफावला असून वैद्यकीय क्षेत्रही आता या पद्धतीने दूषित होऊ लागले आहे. आरोग्याशी संबंधित या पवित्र क्षेत्रालाही पैशांच्या हव्यासापोटी कमिशन खोरीचा काळीमा फासला जात आहे. यामुळे मात्र गरिबांचे जीव धोक्यात येत आहे.या साखळीत आता तालुक्यातील डॉक्टर जोडले जावे त्यासाठी कमीशनवर खास प्रतिनिधींची नियुक्ती केली जात आहे. या साखळीत औषध कंपन्यांचे विक्रेते डॉक्टरांसोबतच बोगस डॉक्टरांनाही समाविष्ट करून घेत असल्यामुळे खासगी आरोग्य सेवा सर्वसमान्यांना न परवडणारी झाली आहे.ग्रामीण भागात शेतकरी शेतमजुरांची संख्या बरीच मोठी असते. त्यांचा वावर पारंपरिक असून शिक्षणाचाही अभाव असते. म्हणूनच डॉक्टरांवर मोठा विश्वास करीत असतात. डॉक्टरांची जितकी फिस ठरवलेली असते तितकी फिस मोजत असतात. डॉक्टर विशिष्ट कंपनीचीच औषधी लिहून देतात. बरेच आजार जेनेरिक औषधांच्या वापराने बरे होऊ शकतात. तरी रुग्णांना महागडी औषधे डॉक्टर नक्कीच औषध विक्रेत्यांच्या नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक आदी छापील कागदावर लिहून देतात. हा प्रकार चुकीचा असला तरीही संबंधित विभागाकडून काही दिशानिर्देश व नियमावली आहे किंवा नाही, असा संभ्रम ग्रामीण भागात निर्माण झाला आहे. ग्रामीण परिसरात बऱ्याच औषध विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. औषध विक्रेते रुग्णांकडून औषधावर छापील किंमत विविध करासह वसूल करीत असतात. दर्जेदार उपयुक्त वातावरणात साठवून ठेवलेल्या औषधी विक्री करणे तितकेच गरजेचे आहे. मात्र औषध विक्रेते औषध साठवून ठेवलेल्या जागेला पाहिजे तसे महत्व न देता तिच औषधे रुग्णांच्या माथी मारीत असतात. तरी रुग्णांना पक्के छापील बिल पूर्ण करासह देत असतात. मात्र पूर्ण छापील किंमत रुग्णांकडून वसूल करुन घेण्यात कोणताच प्रकारचा विलंब करीत नसतात. या प्रकारावर कुणाचेच नियंत्रण नसल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. किरकोळ स्वरुपाचा आजार असो किंवा लहानशी इजा झाली तरी त्याचा उपचारासाठी ३०० ते ४०० रुपयांचे औषध होणारच, हे नित्याचेच झाले आहे. औषधांच्या व्यवसायात ग्रामीण भागात लाखोंची उलाढाल होऊनसुद्धा शासनाला मिळणारा महसूल बुडत आहे. ग्रामीण परिसरात हवे तसे उद्योग नसून बऱ्याच कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन शेतीच आहे. पिकांची रोवणी संपताच खत, औषध, मुलाबाळांचे शिक्षण आदी खर्चाचे डोंगर उभे असते. या कालावधीसह हवामानात बदल घडत असतो. त्यामुळे आजारात वाढ होऊन हा अतिरिक्त खर्च पेलवणारा नसल्यामुळ े कर्जाच्या दरीत सतत वाढ होत असते. रुग्णांना जास्तीत जास्त जेनेरिक औषधे लिहून देण्याचा नियम लागू केला तरच कमिशनराजचे निर्मूलन होणार, असे मत जाणकारांकडून वर्तविले जात आहे. या पवित्र क्षेत्रातून कमिशन राज संपविण्यात यावे.