शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा रेल्वे स्थानकावर कोळसा चोरी सुरूच

By admin | Updated: November 23, 2015 01:37 IST

तिरोडा रेल्वे स्थानकावर थांबलेल्या मालगाड्यांमधून दगडी कोळशाची चोरी ही नित्याचीच बाब झाली आहे.

रेल्वे सुरक्षा दलाचे दुर्लक्ष : महिलासुद्धा चढतात कोळशासाठी मालगाडीवरगोंदिया : तिरोडा रेल्वे स्थानकावर थांबलेल्या मालगाड्यांमधून दगडी कोळशाची चोरी ही नित्याचीच बाब झाली आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) कर्मचारी चोरट्यांना पकडतात व नंतर सोडून देतात. या प्रकारामुळे मालगाड्यांमधून दगडी कोळशाच्या चोरीस वावच मिळत आहे.दोन दिवसांपूर्वी तिरोडा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दगडी कोळशाने भरलेली मालगाडी थांबलेली होती. त्या गाडीच्या डब्यावर दोन इसम चढून भराभर दगडी कोळसा खाली फेकत होते. यात एक महिलासुद्धा होती. या प्रकाराकडे तेथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष होते. मात्र रेल्वेचे कर्मचारी या घटनेपासून अनभिज्ञच होते. हीच बाब पुन्हा आज अनुभवयाला मिळाली. मात्र रेल्वेचे पोलीस कुठे बेपत्ता झाले होते, हे कुणालाही कळले नाही. अशीच घटना सप्टेंबर महिन्यात घडली होती. त्यावेळी चोराला पकडण्यात आरपीएफला यश आले होते. या प्रकाराबाबत गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाचे इन्चार्ज बी.एन. सिंग यांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले होते की, एक व्यक्ती एका पोतीमध्ये गाडीखाली पडलेली कोळशाची चुरी उचलून जमा करीत होता. ही फारशी मोठी बाब नाही, मात्र तरी त्याला रेल्वे अ‍ॅक्टनुसार ताब्यात घेण्यात आले होते. परंतु गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.जर पोलीसच चोरीसारख्या घटनांना फारशी मोठी बाब समजत नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. माणसच काय महिलासुद्धा मालगाडीवर चढून भराभर कोळसा खाली फेकताना दिसत आहे. यात काही अल्पयवयीन मुलांचाही समावेश आहे. वारंवार होणाऱ्या कोळसा चोरीच्या प्रकारात आरपीएफही दुर्लक्ष करून चोरट्यांना पकडत नाहीत. (प्रतिनिधी )सुरक्षा दल वाढवावेमालगाडीवरून दगडी कोळशाची चोरी करणारे पाकीटमारीसुद्धा रेल्वे स्थानक व प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये करतात. कोळशाची चोरी करण्याची संधी न मिळाल्यास हेच चोरटे प्रवासी गाड्यांमध्ये चढून संधी मिळताच प्रवाशांचे पाकीटही मारतात, असे काही जणांनी सांगितले आहे. प्रवाशांचे नुकसान व रेल्वे प्रॉपर्टीची हानी वाचविण्यासाठी तिरोडा रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने सुरक्षा दल वाढविण्याची मागणी आहे.