शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे थंडी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 05:00 IST

डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले होते. परिणामी, गोंदिया जिल्हा विदर्भात सर्वात थंड असल्याची नोंद घेण्यात आली होती. मात्र सध्या जिल्ह्यातील किमान तापमान वाढले असून रविवारी १४.४ अंश सेल्सिअस एवढी नोंद घेण्यात आली आहे. मात्र शनिवारपासून जिल्ह्यात ढगा‌ळ वातावरण निर्माण झाल्याने थंडीचा जोर वाढल्याचे दिसत आहे. ढगा‌ळ वातावरण व त्यात थंड वारा सुटत असल्याने अंगावर काटा येत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  मध्यंतरी अवघ्या विदर्भात सर्वात कमी तापमान असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तापमानात आता वाढ झालेली दिसत आहे. रविवारी (दि. ३) जिल्ह्यातील किमान तापमान १४.४ एवढे नोंदविण्यात आले. मात्र ढगा‌ळ वातावरणामुळे जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्याचेही दिसत आहे. या बदलत्या वातावरणामुळे मात्र पुुन्हा एकदा सर्दी व खोकल्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले होते. परिणामी, गोंदिया जिल्हा विदर्भात सर्वात थंड असल्याची नोंद घेण्यात आली होती. मात्र सध्या जिल्ह्यातील किमान तापमान वाढले असून रविवारी १४.४ अंश सेल्सिअस एवढी नोंद घेण्यात आली आहे. मात्र शनिवारपासून जिल्ह्यात ढगा‌ळ वातावरण निर्माण झाल्याने थंडीचा जोर वाढल्याचे दिसत आहे. ढगा‌ळ वातावरण व त्यात थंड वारा सुटत असल्याने अंगावर काटा येत आहे. शिवाय दिवसाही गरम कापडांची गरज भासत आहे. ढगा‌ळ वातावरण बघता पाऊस पडणार काय, असे चित्र दिसून येत आहे. परिणामी, रात्री शेकोटीची गरज भासू लागली आहे. विशेष म्हणजे, या बदलत्या वातावरणामुळे सर्दी व खोकल्याच्या तक्रारी पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत.

तूर व हरभरा पिकाला धोकाजिल्ह्यात  अचानकच निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तूर व हरभरा पिकाला धोका असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे शेतकरी सांगत आहेत. अशात कृषी विभागाकडून उपाययोजनांबाबत माहिती देण्याची गरज आहे.

टॅग्स :weatherहवामान