कापड दुकानाला लागली आग; लोहा लाईनमधील घटना

By कपिल केकत | Published: September 23, 2023 07:32 PM2023-09-23T19:32:46+5:302023-09-23T19:33:02+5:30

कापड व फर्निचर जळून राख

cloth shop caught fire incidents in iron lines gondia | कापड दुकानाला लागली आग; लोहा लाईनमधील घटना

कापड दुकानाला लागली आग; लोहा लाईनमधील घटना

googlenewsNext

कपिल केकत, गोंदिया : शहरातील बाजारातील लोहा लाईनमधील रेडिमेड कपड्यांच्या दुकानाला आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि. २२) पहाटे ६:२० वाजेदरम्यान घडली. यामध्ये कपडे व फर्निचर जळून राख झाले.

बाजारातील लोहा लाईनमध्ये दीपक हरिराम मूलचंदानी यांचे रेडिमेड कापडाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाला आग लागली. हा प्रकार शुक्रवारी (दि. २२) पहाटे ६:२० वाजेदरम्यान गोपाल अग्रवाल यांच्या लक्षात आल्याने त्यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहितीच्या आधारे अग्निशमन विभागाच्या पथकाने लगेच घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत दुकानातील कपडे व फर्निचर जळून गेले होते. या घटनेत आग कशी लागली व किती नुकसान झाले हे वृत्त लिहीपर्यंत कळू शकले नाही. ही कारवाई शिफ्ट इन्चार्ज मुकेश माने, फायरमन शहबाज सय्यद, राहुल नागपुरे, वीरेंद्र नागपुरे, वाहनचालक लोचन कावडे यांनी पार पाडली.

Web Title: cloth shop caught fire incidents in iron lines gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.