शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संक्रमणात नागरिक फिरतात बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 05:00 IST

भाजीपाला बाजार, गावातील दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करीत आहेत. या गर्दीकडे वेळीच प्रशासनाने लक्ष घातले नाही. तर कोरोना विषाणू मोठे रौद्ररुप धारण केल्याशिवाय राहणार नाही. यामुळे निर्माण होणाऱ्या संकटांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देदंडात्मक कारवाईची गरज : स्थानिक समित्यांनी घ्यावी दखल

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : जिल्ह्यातील शहराप्रमाणे खेड्यामध्ये सुद्धा कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत असताना लॉकडाऊन शिथिल केल्यापासून नागरिकांच्या मनात कोरोना विषाणू संबंधी भीती, चिंता असताना देखील नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क लावणे आदीकडे दुर्लक्ष करुन बिनधास्त फिरताना दिसत आहेत. भाजीपाला बाजार, गावातील दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करीत आहेत. या गर्दीकडे वेळीच प्रशासनाने लक्ष घातले नाही. तर कोरोना विषाणू मोठे रौद्ररुप धारण केल्याशिवाय राहणार नाही. यामुळे निर्माण होणाऱ्या संकटांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी हे परिसर जिल्ह्यापासून दूर असले तरी लॉकडाऊन शिथिल केल्यापासून नागरिक बिनधास्त फिजिकल डिस्टन्सिंग ठेवता व मास्कचा वापर न करता विनाकारण इकडून तिकडे फिरताना दिसत आहेत. दिवसागणिक कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याची नागरिकांच्या मनात भीती, चिंता निश्चित आहे. महत्त्वाचे काम नसताना सुद्धा गावातील दुकांनामध्ये भाजीपाला बाजारामध्ये नागरिक गर्दी करीत आहे. हे नियम मोडणाऱ्यांमध्ये सुशिक्षीत वर्गाचा अधिक समावेश आहे.या लोकांना कोरोनाच्या परिणामाची जाणीव असताना सुद्धा अत्यंत बेजबाबदारीने वागत आहेत. यावर ग्रामपंचायत प्रशासनाने कंबर कसून अशा नियम मोडणाºया लोकांकडून दंड वसूल करणे अपेक्षित आहे. ग्रामपंचायतीने निर्माण केलेली गाव कोरोना निर्मूलन समितीची कार्य थंडावण्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे गावात विना मास्क फिरणाºयांची संख्या वाढली आहे. गावातील रस्त्यावर प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे. यामुळे कोरोना विषाणू मोठे रौद्ररुप धारण करण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Marketबाजार