शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

सर्वशिक्षा विस्तार सेवेच्या नावाने फसवणूक

By admin | Updated: April 28, 2015 00:53 IST

विविध संस्थांच्या नावाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना लुबाडणारे रॅकेट

बोगस संस्थेचा प्रताप : ग्रामपंचायतींच्या माध्यमातून बेरोजगारांना टार्गेटआमगाव : विविध संस्थांच्या नावाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना लुबाडणारे रॅकेट सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी मुंबई येथील एज्युकेशनल सर्व्हिसेस या नावाने असलेल्या संस्थेविरूद्ध आमगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.मुंबई येथील एज्युकेशनल सर्व्हिसेस या नावाने असलेल्या संस्थेने ‘सर्वशिक्षा विस्तार सेवा’अंतर्गत संपूर्ण राज्यात तसेच सर्व जातींसाठी शिक्षकांच्या भरतीकरिता इंटरनेटवर जाहीरात टाकण्यात आली. ही संस्था म्हणजे शासनाचाच एक विभाग आहे, असे भासविण्यासाठी ग्रामपंचायतींचा आधार घेण्यात आला आहे. शासनाच्या ‘सर्व शिक्षा अभियान’ या उपक्रमाशी नामसाधर्म्य ठेवत ‘सर्वशिक्षा विस्तार सेवाये’अंतर्गत ही पदे भरली जात असल्याचे जाहीरातीत भासविण्यात आले. यात बारावी उत्तीर्ण बेरोजगारांसाठी भारतातील सर्व गावांत शिक्षा विकासाकरिता विस्तारसेवेद्वारे दोन शिक्षक व दोन शिक्षिका यांच्या नियुक्तीकरिता अर्ज मागविण्यात आले. संस्थेबद्दल विश्वासार्हता वाटावी यासाठी सुशिक्षित बेरोजगारांनी अर्जावर आपल्या गावातील सरपंचाच्या स्वाक्षरीचे प्रपत्रही भरून द्यावे, असे नमुद केले. ग्रामपंचायतीला माध्यम बनविल्यामुळे अनेकांचा त्यावर विश्वास बसला. त्यामुळे नोकरीच्या आशेने अनेक बेरोजगारांनी आपल्या ग्रामपंचायतीकडे धाव घेतली. मात्र प्रत्यक्षात कोणत्याच ग्रामपंचायतीला या जाहीरातीबाबत कल्पना नाही. त्याबद्दल कोणत्याच विभागाकडूनही त्यांना काही सूचना नाहीत. (शहर प्रतिनिधी)डी.डी.च्या माध्यमातून कमाईया अर्जासोबत प्रत्येक बेरोजगाराला ६५५ रुपयांचा डिमांड ड्रॉफ्ट ‘एज्युकेशनल सर्र्व्हिसेस, भगतसिंग नगर नं.२, लिंक रोड, गोरेगाव वेस्ट, मुंबई’ या नावे बनवून अर्ज पाठविण्यास नमुद केले होते. येत्या ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण राज्यभरातील हजारो, लाखो बेरोजगार या जाहीरातीला बळी पडून डी.डी. पाठवू शकतात. त्यामुळे आतापर्यंत या संस्थेने बेरोजगारांकडून लाखोंच्या घरात पैसे उकळले असण्याची शक्यता आहे.शिक्षण विभागाचे हात वरया संदर्भात शासनाकडून कोणतीही जाहिरात प्रकाशित करण्यात आली नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. एखाद्या एनजीओला सुद्धा हे काम सोपविण्यात आल्याची माहिती आपल्याकडे नसल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. त्यामुळे सदर एज्युकेशन सर्वीसेस नावाच्या संस्थेने दिलेली ही जाहीरात बनावट असून त्यातून केवळ बेरोजगारांची फसवणूक होत असल्याची तक्रार काही बेरोजगारांनी केली आहे. सदर संस्थेवर फौजदारी कारवाईची मागणी होत आहे.एज्युकेशनल सर्व्हिसेसचा बनावटपणामुंबई येथील एज्युकेशनल सर्व्हिसेस या संस्थेने दिलेल्या जाहीरातीत शिक्षक या पदासाठी फक्त बारावी उत्तीर्ण ही शैक्षणिक योग्यता मागितली आहे, परंतु प्रत्यक्षात शिक्षक या पदासाठी संपूर्ण राज्यात आणि देशभरात शिक्षणशास्त्र पदविका व पदवी आवश्यक आहे. परंतू जास्तीत जास्त बेरोजगारांनी या जाहीरातीला बळी पडून आपल्याकडे अर्ज व डीडी पाठवावेत, हाच या संस्थेचा त्यामागील हेतू असल्याचे स्पष्ट होत आहे.