शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

डोंगर तलाव व पिंडकेपार बागेचा होणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 21:06 IST

केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत शहरातील डोंगर तलाव व पिंडकेपार येथील बागेत विविध विकास कामे करण्यात येणार असल्याने ....

ठळक मुद्दे७१ लाखांचा प्रकल्प : नगर परिषदेने काढली निविदा

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत शहरातील डोंगर तलाव व पिंडकेपार येथील बागेत विविध विकास कामे करण्यात येणार असल्याने लवकरच डोंगर तलाव व पिंडकेपार बाग कात टाकणार आहे.गोंदिया शहराचा सर्वच क्षेत्रात विकास होत असला तरिही हरित क्षेत्राच्या बाबतीत शहर मागासलेलेच आहे. आजघडीला शहरात सिव्हील लाईन्स परिसरातील सुभाष बाग हे एकच बाग उरले असून याशिवाय दुसरे हिरवळीचे स्थान नाही. मात्र देखभाल दुरूस्ती अभावी सुभाष बागेचीही स्थिती काही बरी नाही. नगर परिषदेकडून बागेला रेटत चालल्याचे दिसून येत आहे. शहरातील पिंडकेपार व कुडवा येथे नवे बाग तयार केले जात आहे. मात्र सध्यातरी शहरवासीयांना मोकळ््या हवेत श्वास घेण्यासाठी दुसरी जागाच उरलेली नाही. हीच बाब हेरून केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पावर गांभीर्याने लक्ष दिले जात आहे.यातूनच मुंबईच्या टंडन अर्बन सोल्यूशन प्रायव्हेट लिमीटेड यांच्याकडे हे काम देण्यात आले आहे. त्यानुसार या एजंसीचे कर्मचारी विकास भालेराव यांनी मध्यंतरी शहरातील डोंगरतलाव व पिंडकेपार बागेची पाहणी करून छायाचीत्र व नगर परिषदेकडून संपूर्ण माहिती घेतली होती. या एजंसीने डोंगरतलाव व पिंडकेपार बागेच्या सौंदर्यीकरणाचा प्रकल्प अहवाल तयार करून नगर परिषदेकडे पाठविला होता. तर नगर परिषदेने प्रकल्प अहवाल प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला होता. शासनाकडून या प्रकल्पाला मंजूरी मिळाल्याने डोंगरतलाव व पिंकडेपार बागेच्या सौंदर्यीकरणाची वाट मोकळी झाली आहे.विशेष म्हणजे नगर परिषदेने या कामांना घेऊन आॅनलाईन निविदा काढली आहे. लवकरच या कामांसाठी काढलेली निविद उघडल्यानंतर कामांना सुरूवात होणार. ‘अमृत’च्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत अशाच प्रकारे कामे होत राहिल्यास शहरात नक्कीच हरित क्षेत्र तयार होऊन त्यांचा विकास होणार.बाग कात टाकणारडोंगर तलाव व पिंडकेपार येथील बागेच्या सौंदर्यीकरणाचा हा प्रकल्प ७१ लाख ४९ हजार ५०० रूपयांचा आहे. यांतर्गत डोंगर तलाव परिसरात असलेल्या जागेचे सौंदर्यीकरण व वृक्षारोपण केले जाईल.तसेच पिंकडेपार बागेतही सौंदर्यीकरण व वृक्षारोपण केले जाणार आहे. ही कामे झाल्यानंतर आजघडीला असलेली या दोन्ही स्थानांची स्थिती बदलणार व त्यांना नवे रूप मिळणार यात शंका नाही. म्हणजेच ही दोन्ही कामे झाल्यानंतर डोंगर तलाव व पिंडकेपार बाग कात टाकणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.