शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आठ कारवायांत पकडली ३० लाखांची रोकड

By admin | Updated: October 7, 2014 23:35 IST

अलीकडे निवडणुकांतील पैशांचा वाढत खेळ लक्षात घेता निवडणूक विभागाने यावर डोळा ठेवण्यासाठी भरारी पथकं तयार केली आहेत. या पथकांनी आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारीही

भरारी पथकांची कारवाई : पैसा कुणाचा? चौकशी सुरूगोंदिया : अलीकडे निवडणुकांतील पैशांचा वाढत खेळ लक्षात घेता निवडणूक विभागाने यावर डोळा ठेवण्यासाठी भरारी पथकं तयार केली आहेत. या पथकांनी आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारीही उत्कृष्टरित्या पार पाडली असून आतापर्यंत आठ कारवायांत ३० लाख २९ हजार ८०० रूपयांची रोकड जप्त केली आहे. पकडण्यात आलेली ही रक्कम जिल्ह्यात तीन विधानसभा क्षेत्रांत करण्यात आलेल्या कारवाईतील आहे. निवडणुकांमध्ये वापरल्या जात असलेला पैसा आणि दारू पुरवठ्यातून मतदारांना आमिष देण्याचा प्रयत्न केला जातो. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करून निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी उमेदवार आज साम, दाम, दंड व भेद या चारही अस्त्रांचा वापर करतात. त्यात विशेषत: मतदारांना खुश करण्यासाठी उमेदवार पैसा ओतताना दिसत आहे. या सर्व प्रकारांवर आळा बसावा यासाठी निवडणूक विभागाने जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रांसाठी प्रत्येकी तीन भरारी पथक तयार केले आहेत. सर्व गैरप्रकारांवर नजर ठेऊन त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली आहे. या पथकांनी तीन विधानसभा क्षेत्रांत आतापर्यंत पैशाच्या हिशेब न देऊ शकणारी आठ वाहने पकडून त्यातील रोकड जप्त केली आहे. यात १९ सप्टेंबर रोजी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्राम अदासी तांडा येथे पथकाने एका गाडीतून ५.५० लाखांची रोकड जप्त केली. तर त्याच दिवशी कोरणी नाका येथे गाडीतून ४.९७ लाखांची रोकड पकडण्यात आली. २३ सप्टेंबर रोजी पथकाने तिरोडा विधानसभा क्षेत्रात तिरोडा-तुमसर मार्गावर नाकाबंदी दरम्यान तीन लाख तर आमगाव विधानसभा क्षेत्रातील हरदोली नाका येथे १० लाखांची रोकड पकडली. २५ सप्टेंबर रोजी तिरोडा विधानसभा क्षेत्रातील गोरेगाव दोन लाख तर २७ सप्टेंबर रोजी ७७ हजार ८०० रूपयांची रोकड पथकाने पकडली. २८ सप्टेंबर रोजी आमगाव विधानसभा क्षेत्रातील देवरी येथे १.७८ लाखांची तर १ आॅक्टोबर रोजी तिरोडा विधानसभा क्षेत्रातील गोरेगाव येथे २.२७ लाख रूपयांची रोकड पथकाने गाडीतून जप्त केली. अशाप्रकारे एकूण आठ कारवायांतून पथकाने ३० लाखांची रोकड पकडली असून सदर रक्कम संबंधित पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. संबंधित ठाण्याच्या माध्यमातून ही रोकड नेत असलेल्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. यातील रकमेचा खुलासा मिळाल्यास ती रक्कम परत केली जाणार असून अन्यथा ती रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केली जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)