शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

बस व रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल

By admin | Updated: April 29, 2016 01:50 IST

लग्न समारंभ तसेच शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांमुळे बसस्थानक व रेल्वे स्थानकावर एकच गर्दी दिसून येत आहे.

लग्नसराईची धूम : पिण्याच्या पाण्याची गैरसोयरावणवाडी : लग्न समारंभ तसेच शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांमुळे बसस्थानक व रेल्वे स्थानकावर एकच गर्दी दिसून येत आहे. रेल्वे गाड्या, महामंडळाच्या व खासगी बसेस हाऊसफूल्ल भरुन जात असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे. तर काळीपिवळी आॅटोवाल्यांची चांदी झाली आहे. मार्च एप्रिल महिन्यात बोर्डाच्या परीक्षा आटोपल्याने हजारो विद्यार्थी प्रवास करतात. तर बाल गोपालानांही उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. तर अशातच लग्न समारंभ धुमधडाक्यात सुरू आहेत. त्यामुळे जाण्यायेण्याची मोठ्याने गर्दी वाढली आहे. परंतु बसेस व रेल्वे गाड्यांची कमतरता असल्याने क्षमतेच्यावर वाहनांमध्ये बसून प्रवास करीत आहेत. त्यामुळे अवैध वाहनांना एक संधीच मिळाली आहे. गोंदिया मुख्य बसस्थानक व शहर बस स्थानकावर नेहमीच गर्दी असली तरी ऐन उन्हाळ्याच्या दिवसात प्रवासी मोठ्या प्रमाणात बसने प्रवास करीत आहेत. असेच चित्र गोंदिया रेल्वे स्थानकावर दिसून येते. तिकीट काऊंटरवर एका एका खिडकीवर तीनतीन रांगा दिसून येत आहेत. पॅसेंजर व लोकल गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.फार मोठ्या गर्दीने रेल्वे स्थानकावर अनेक प्रकारचे अपघात होवून काहींना तर आपले प्राण गमवावे लागते. याची पर्वा न करता तोबा गर्दीत लहानसहान चिमुकल्या बच्चे कंपनीसोबत प्रवास करीत आहेत. एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकत आहे. पण एसटी महामंडळ किंवा खासगी बसेसचे मालक प्रवाशांकरिता पिण्याच्या पाण्याचा तरी व्यवस्था करीत नाहीत. बहुतांश ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना विकतचे पाणी घेवून आपली तहान भागवावी लागत आहे. (वार्ताहर)