शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

वीज कापल्याने बीएसएनएल सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

भारत संचार निगमच्या सेवेवर अवलंबून असलेल्या भ्रमणध्वनी, इंटरनेट व ब्रॉडबँड अशा सर्वच सेवांचा कारभार कोलमडला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. बीएसएनएलचा कार्यालयीन निधी मुंबई व दिल्ली येथून येतो. तो कधी प्राप्त होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ठळक मुद्दे१८ लाखांचे वीज बिल थकले : सेवा ठप्प पडल्याने ग्राहकांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : भारत संचार निगम लिमिटेड कंपनीने सहा महिन्यांचे वीज बिल थकविले आहे. परिणामी वीज वितरण कंपनीने त्यांची वीज कापल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागात सेवा ठप्प झाली आहे. याचा ग्राहकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.तालुक्यात अर्जुनी येथे तीन, नवेगावबांध येथे दोन तसेच गोठणगाव, केशोरी, महागाव, इटखेडा, वडेगाव व बोंडगावदेवी येथे प्रत्येकी एक याप्रमाणे मनोरे आहेत. तसेच भरनोली, धाबेटेकडी व नवनीतपूर येथे सौर उर्जेवर चालणारे मनोरे आहेत. यापैकी केवळ अर्जुनी-मोरगाव येथील दोन मनोरे सुरू असून इतर सर्व मनोऱ्यांची वीज कापण्यात आली आहे. या सर्व मनोऱ्यांचे १८ लक्ष ३१ हजार १९० रु पयांचे वीज बिल गेल्या सहा महिन्यांपासून थकीत असल्याचे समजते. येथील चालू महिन्याचे एक लक्ष ६७ हजारांचे बिल आले आहे. अशात वीज वितरण कंपनीने वीज कापल्याने भारत संचार निगमच्या सेवेपासून ग्राहक वंचित आहेत.भारत संचार निगमच्या सेवेवर अवलंबून असलेल्या भ्रमणध्वनी, इंटरनेट व ब्रॉडबँड अशा सर्वच सेवांचा कारभार कोलमडला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. बीएसएनएलचा कार्यालयीन निधी मुंबई व दिल्ली येथून येतो. तो कधी प्राप्त होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. कंपनीने ग्राहकांना सवलतीचे आमिष दाखवून वार्षिक रिचार्ज शुल्क घेतले आहेत. मात्र अशी सेवा खंडित करून ग्राहकांची फसवणूक केली आहे असा आरोप केला जात आहे. अशा प्रकारांमुळे खासगी कंपन्यांनी येथे घट्ट पाय रोवले आहेत. ही समस्या केंद्र शासनाशी निगडित आहे. मात्र खासदार सुनील मेंढे यांचे परिसरात दौरे होत नसल्याने कैफियत मांडायची कुणाकडे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.पाठपुरावा सुरू आहेथकीत वीज बिल संदर्भात वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. महागाव येथील सेवा येत्या एक-दोन दिवसांत सुरू होईल. अर्जुनी-मोरगाव येथील दोन मनोºयांचा वीजपुरवठा सुरू आहे. निधी प्राप्त होताच थकीत विज बिलांचा भरणा केला जाईल व सेवा सुरळीत होईल, अशी माहिती दूरसंचार अधिकारी परिहार यांनी दिली.

टॅग्स :BSNLबीएसएनएलelectricityवीज