शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शेततळे योजना ठरली शेतकर्‍यांसाठी वरदान

By admin | Updated: May 25, 2014 23:41 IST

शासनाने शेतीकरिता जल सिंचनाच्या विविध योजना कार्यान्वीत केल्या. जेणेकरून शेतकरी शेतीच्या उत्पादनात वाढ करून आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकेल. यात काही शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात

साखरीटोला : शासनाने शेतीकरिता जल सिंचनाच्या विविध योजना कार्यान्वीत केल्या. जेणेकरून शेतकरी शेतीच्या उत्पादनात वाढ करून आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकेल. यात काही शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात फायदा घेतला तर अजूनही बरेच शेतकरी योजनांपासून वंचित आहेत. मात्र हरदोली येथील एका महिला शेतकरीने शेततळ्याचा जल सिंचनाकरिता उपयोग करून केवळ एका एकरात भाजीपाल्याच्या उत्पादनात लाखोची मिळकत घेतली आहे.

शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकर्‍यांना शेततळ्याचा सिंचनासाठी उपयोग व्हावा म्हणून शेततळे बांधून दिली जातात. त्या अंतर्गत निर्मला चरणदास बोम्बार्डे हरदोली ता. देवरी या महिला शेतकर्‍यांनी ३0 फूट चौरस भागात शेततळीचे खोदकाम केले. पाणी अडवा, पाणी जिरवा या म्हणीनुसार त्या शेततळ्यात पाणी अडवून त्या तळ्याच्या साहाय्याने आपल्या एक एकर जागेत विविध प्रकारचा भाजीपाल्याची लागवड केली. त्यामुळे त्यांना बराच फायदा झाला. सन २0११-१२ मध्ये चवळीच्या शेंगा, उन्हाळी, वाल, मका, टमाटर व विविध भाजीचे उत्पादन घेतले.

सन २0१२-१३ मध्ये टरबूज, मका, टमाटर, मिरची तर सन २0१३-१४ मध्ये हरभरा, मका, चवळी शेंगा, टमाटर, भुईमूंग, मिरची अशा विविध भाज्यांचे उत्पादन काढले. शेततळीमध्ये २५ किलो मोठी मत्स्य वीज टाकण्यात आले. त्यामुळे मत्स्य उत्पादन सुध्दा घेण्याकरिता मदत झाली. या तिन्ही वर्षात १ लाख २0 हजार रुपये अंदाजे नफा झाल्याचे तिने सांगितले आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात कोथिंबीर, कारलेचे उत्पादन घेतले जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर बांबू, नेट खरेदी करून हरितगृह तयार करण्यात आले आहे. सदर शेतकरी महिलेने २ हजार रुपये खर्च करून ६0 बाय ३0 फुटाचे नेट हाऊस तयार करण्यात आले. विशेषत: हा ज्या जागवर गुरेढोरे चरत होते. अशा नापिकी जमिनीवर सदर शेतकरी महिलेने शेततळ्याच्या भरवशावर हिरवळ तयार करून स्वत:च्या मेहनतीने भाजीपाल्याचे उत्पादन केले. ‘पाणी त्याची बाणी’ या युक्तीप्रमाणे पुढे याच ठिकाणी केळीची बाग व फुलशेती करण्याचा निर्धार केला आहे.

शेततळे बहुतांश शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेले आहे. सदर शेतकरी महिलेला शासकीय मदत व मार्गदर्शन कृषी पर्यवक्षक प्रकाश मेश्राम देवरी, पर्यवेक्षक जिभकाटे, पारधी, कु.डी. गौतम, कृषी सहायक तिडके यांनी वेळोवेळी यांनी केली आहे.

कृषी अधीक्षक गोंदिया यांनी अनुदान तत्त्वावर नेट व काटेरी कुंपणाची योजना द्यावी, अशी मागणी आदर्श शेतकरी होऊ पाहणार्‍या निर्मला चरणदास बोम्बार्र्डे यांनी केली आहे. (वार्ताहर)