पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:31 AM2021-05-06T04:31:26+5:302021-05-06T04:31:26+5:30

गोंदिया : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण सुरु झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल ...

BJP protests against violence in West Bengal () | पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने ()

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने ()

Next

गोंदिया : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण सुरु झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करीत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. या राजकीय हिंसाचाराचा भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्ह्यातर्फे बुधवारी (दि.५) निषेध करण्यात आला.

भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी घटनेच्या निषेधार्थ फलक घेऊन व काळ्या फिती लावून निदर्शने केली. गोंदिया शहरात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. माजी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर, माजी आ. रमेश कुथे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर, खा. सुनील मेंढे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर, नगरसेवक जितेंद्र (बंटी) पंचबुद्धे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर, सिंधी कॉलनी, श्रीनगर आदी ठिकाणी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या हिंसाचार विरोधात फलक घेत निषेध करण्यात आले. यावेळी माजी आ. गोपालदास अग्रवाल, माजी आ. रमेश कुथे, जिल्हा संघटन महामंत्री संजय कुलकर्णी, जिल्हा कोषाध्यक्ष दिनेश दादरीवाल, जिल्हा उपाध्यक्ष अशोक चौधरी, शहर अध्यक्ष सुनील केलनका, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनलाल ठाकरे, न. प. सभापती राजकुमार कुथे, सभापती बंटी पंचबुद्धे, नगरसेवक क्रांती जायस्वाल, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित झा, जिल्हा सचिव ऋषिकांत साहू, शहर महामंत्री संजय मुरकुटे, मनोज पटनायक, नेत्रदीप (गोल्डी) गावंडे, महेंद्र पुरोहित, अजय गौर, अंकित जैन, राजेश चौरसिया, संदीप रहांगडाले, मिलिंद बागडे, सुरेश चंदनकर,योगेंद्र सोलंकी, भरत साहू, पुरु ठाकरे, प्रवीण पटले,पुरण पाथोडे, यशपाल डोंगरे, राकेश अग्रवाल, सुमित महावत, लोकेश महादूले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते विविध ठिकाणी सहभागी झाले होते.

Web Title: BJP protests against violence in West Bengal ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.