शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्रीकडून पोटच्या गोळ्याची हत्या

By admin | Updated: May 9, 2015 01:26 IST

संशयाची सुई घर उद्ध्वस्त करते. अशाच संशयातून आणि त्यातून निर्माण झालेल्या कलहातून जन्मदात्या आईनेच पोटच्या आठ वर्षीय मुलाची हत्या करून ...

गोंदिया : संशयाची सुई घर उद्ध्वस्त करते. अशाच संशयातून आणि त्यातून निर्माण झालेल्या कलहातून जन्मदात्या आईनेच पोटच्या आठ वर्षीय मुलाची हत्या करून नंतर स्वत: विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गोंदिया शहरातील मरारटोली परिसरात भाड्याने राहणाऱ्या एका घरात हा थरार मध्यरात्रीनंतर घडला.पतीशी असलेल्या वादातून सदर महिलेने हे कृत्य केल्याचे बोलले जाते. शुक्रवारच्या पहाटे २.३० वाजता दरम्यान घडलेल्या या घटनेने मरारटोली परिसर हादरून गेला आहे. अनुप राजू अलाम (८) असे मृत बालकाचे नाव आहे, तर त्याला मारून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मातेचे नाव प्रीती राजू अलाम (३५) असे आहे. प्रीतीचे माहेर गडचिरोली जिल्ह्यातील आहे. तिचे पती राजू अलाम हे गोंदियाच्या एसटी आगारात वाहन चालक म्हणून नोकरीवर आहेत. मागील सहा महिन्यांपासून ते मरारटोलीच्या कन्हैय्या भैय्यालाल पारधी (४२) यांच्या घरी भाड्याने राहतात. राजू अलाम यांच्या सासुरवाडीत लग्न समारंभ असल्याने ते १५ दिवसांपासून गडचिरोली येथे कुटुंबासह गेले होते. त्यांची मोठी मुलगी १० वर्षाची तर लहान मुलगा मृतक अनुज हा आठ वर्षाचा होता. मुलीला मामाच्या घरी ठेवून लग्न समारंभावरून ते दाम्पत्य मुलाला घेऊन बुधवारी सायंकाळी गोंदियात आले. रात्रभर राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारी राजूला ड्युटीवर अमरावती येथे जायचे होते. ते गुरूवारच्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अमरावतीला जाण्यासाठी निघाले.गुरूवारी घरमालक कन्हैया पारधी आपल्या कुटुंबासोबत विशाल लॉन येथे लग्न समारंभाला गेले होते. रात्री ११.३० वाजता आल्यावर घरी शांतता होती. घरमालक पारधी घरी आले त्यावेळी वीज पुरवठा खंडीत झालेला असल्याने ते झोपण्यासाठी छतावर गेले. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते घरकाम करीत असताना त्यांना विहिरीत मोठा आवाज झाला. त्यावर कन्हैया पारधी यांचा लहान भाऊ संतोष विहिरीत कुणीतरी उडी घेतली असे ओरडला. त्यावर शेजारचे लोक धाऊन आले. प्रितीने विहिरीत उडी घेतल्याने संतोष व कन्हैया यांनीही विहिरीत उडी घेऊन तिला वाचविले. (तालुका प्रतिनिधी)प्रीती अजूनही बेशुद्धप्रीतीला विहिरीतून काढले तेव्हापासून आतापर्यंत ती बेशुध्द होती. तिच्या गळ्यावर जखमा होत्या. त्या जखमेतून रक्त निघत नव्हते. वेळीच रूग्णवाहिकेसाठी रामनगर पोलिसांना फोन केला. प्रीतीने आत्महत्येचा प्रयत्न केला तर तिचा मुलगा कुठे आहे हे पाहण्यासाठी पारधी कुटुंबीय त्यांच्या खोलीत गेले. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात अनुज पडला होता. चाकूने त्याच्या गळ्यावर दोन घाव केले होते. रामनगर पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात भादंविच्या कलम ३०२, ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घरगुती कलहच जबाबदार?मुलाचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्रीती राजू अलाम (३५) हिची प्रकृती चिंताजनक आहे. तिला उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. ती बेशुद्धावस्थेत असल्यामुळे या प्रकरणाचे कारण पुढे येऊ शकले नाही. परंतु घरगुती वादातून हे कृत्य झाल्याचे बोलले जाते. पतीचे बयान देणार प्रकरणाची माहितीप्रीतीचे पती राजू अलाम अमरावती येथे नोकरीसाठी गेल्याने त्यांच्या माघारीच हे कृत्य झाले. त्या पती-पत्नीत काय वाद झाला, याची माहिती पुढे आली नाही. हे प्रकरण काय आहे याची माहिती राजू अलाम यांच्या बयानातून पुढे येणार आहे. सायंकाळपर्यंत त्यांचे बयाण होणे बाकी होते.