शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य

By admin | Updated: February 27, 2017 00:14 IST

तिरोडा शहराचा सर्वांगीण विकास आणि शहरवासीयांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी

राजकुमार बडोले : ४ कोटी ७१ लाखांतून होणार सभागृह तिरोडा : तिरोडा शहराचा सर्वांगीण विकास आणि शहरवासीयांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. २५ फेब्रुवारी रोजी नगरपरिषद गांधी विद्यालय तिरोडा येथील परिसरात वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत विशेष अनुदानातून ४ कोटी ७१ लक्ष रुपयांच्या बहुउद्देशीय सभागृहाच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ.रहांगडाले होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, माजी आमदार भजनदास वैद्य, हरीश मोरे, न.प.उपाध्यक्ष सुनिल पालांदूरकर, माजी नगराध्यक्ष अजियसंह गौर, मुख्याधिकारी उरकुडे उपस्थित होते. पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, तिरोडा शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. नगरपरिषदेने जो विकास आराखडा तयार केला आहे त्यानुसार कामे होत आहेत का हे महत्वाचे आहे. कामे झाली असतील तर शहर सर्व्हेक्षण करून आराखडा पुन्हा तयार करण्यात येईल. विकास करताना आराखड्यानुसार कामे झाली पाहिजेत. नागरी सुविधांची कामे करण्यात येतील. नगरोत्थान योजनेतून निधी देणार असल्याचे सांगून महात्मा फुले वार्डातील वन जमिनीच्या पट्यांचा प्रश्न दूर करुन सुटला पाहिजे. याबाबत लवकरच बैठक घेवून त्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येईल. शहरातील पात्र व गरजू लाभार्थ्यांना २०१९ पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकूल योजना व शबरी घरकूल योजना या योजनांमधून घरकुल बांधून देण्यात येतील. तिरोडा नगरपालिका क्षेत्रातील समस्यांची सोडवणूक करण्यात येईल असेही सांगितले. यावेळी अतिथींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला तिरोडातील नागरिकांची विशेषत: महिलांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.