शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांच्या तोंडाला पुसल्या गेली पाने

By admin | Updated: October 21, 2014 22:54 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत व्यापक लोकसहभाग अपेक्षित आहे. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे कार्य केल्यास त्यांचा सत्कार करण्याचे

गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत व्यापक लोकसहभाग अपेक्षित आहे. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे कार्य केल्यास त्यांचा सत्कार करण्याचे शासनाने ठरविले होते. परंतु या मोहिमेला सहा वर्षांचा कालावधी लोटूनही शासनाने मोहीम राबविणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान केला नाही.तंटामुक्त गाव मोहीम प्रभावीपणे राबविण्यासठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती, तालुका स्तरावरील समिती व पोलीस ठाणे स्तरावरील समिती तयार केली. अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तंटामुक्त गाव समितीस येणाऱ्या सर्व अडचणींचे निराकरण करून त्यांना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहित केले. यासाठी शासन मोहीम राबविणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान करणार होते. या मोहिमेसाठी मोहीम अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. परंतु शासनाने त्यांचा सत्कार केला नाही.विभागीय आयुक्त आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (परिक्षेत्र) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मोहिमेच्या अंमलबजावणीचा वेळोवेळी आढावा घेऊन प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावे, असे सुचविले. मोहिमेतील कामकाज हे वेगळ्या स्वरूपाचे असल्याने विकास प्रशासकीय व पोलीस यंत्रणेस व्यापक लोकसंवाद साधून समर्पितपणे काम करावे लागले. त्या दृष्टीने मोहिमेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या विकास प्रशासकीय व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना खालीलप्रमाणे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार, असे शासन निर्णयात नमूद केले. महसूल विभागातील राज्यातील सहा महसूल विभागांपैकी ज्या महसूल विभागात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सर्वोत्कृष्ट अंमलबजावणी होईल म्हणजे त्या विभागातील एकूण ग्रामपंचायतींच्या तुलनेच सदर मोहिमेच्या अंमलबजावणी वर्षात तंटामुक्त गावांची टक्केवारी सर्व विभागांपेक्षा अधिक असेल, अशा विभागाच्या विभागीय आयुक्तांना त्यांनी केलेल्या सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. पोलीस परिक्षेत्रातील राज्यातील सात पोलीस परिक्षेत्रांपैकी ज्या पोलीस परिक्षेत्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सर्वोत्कृष्ट अंमलबजावणी होईल म्हणजेच त्या परिक्षेत्रातील एकूण ग्रामपंचायतींच्या तुलनेत सदर मोहिमेच्या अंमलबजावणी वर्षात तंटामुक्त गावांची टक्केवारी सर्व परिक्षेत्रांपेक्षा अधिक असेल, अशा पोलीस परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून त्या महसूल विभागात असलेल्या जिल्ह्यांपैकी ज्या जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सर्वोत्कृष्ट अंमलबजावणी होईल म्हणजेच त्या जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतीच्या तुलनेत सदर मोहिमेच्या अंमलबजावणी वर्षात तंटामुक्त गावांची टक्केवारी त्या विभागातील इतर जिल्ह्यांपेक्षा अधिक असेल, अशा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून ज्या तालुक्यांमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सर्वोत्कृष्ट अंमलबजावणी होईल म्हणजेच त्या तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतींच्या तुलनेत सदर मोहिमेच्या अंमलबजावणी वर्षात तंटामुक्त गावांची टक्केवारी त्या जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा अधिक असेल, अशा तालुक्याचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ज्या पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सर्वोत्कृष्ट अंमलबजावणी होईल म्हणजेच त्या पोलीस ठाणे परिक्षेत्रातील एकूण ग्रामपंचायतींच्या तुलनेत सदर मोहिमेच्या अंमलबजावणी वर्षात तंटामुक्त गावांची टक्केवारी त्या जिल्ह्यातील इतर पोलिस ठाणे परिक्षेत्रांपेक्षा अधिक असेल, अशा पोलीस ठाण्यांचे प्रमुख यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. गावपातळीवर जिल्ह्यातील गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या तंटामुक्त गावातील बीट हवालदार, गाव कामगार तलाठी व ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल, असे ठरले होते. मात्र शासन निर्णयाप्रमाणे सदर मोहीम राबविण्यात येत नसल्याची ओरड सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)