शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

रेतीमाफियांवर कारवाईला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 6:00 AM

अप्पर जिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी १८ नोव्हेंबरला तिरोडा तहसीलदारांना पत्र देऊन लोकमतमध्ये प्रकाशीत बातमीचा आधार घेत त्यांच्याकडून यावर स्पष्टीकरण मागविले आहे. रेतीघाटावरुन रेतीचा अवैध उपसा सुरुच ही अतिशय गंभीर बाब असून यापूर्वी कार्यालयाने दिलेल्या पत्राची दखल न घेतल्याने स्थानिक वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित होत आहेत.

ठळक मुद्देमहसूल विभागात खळबळ : रेतीचे तीन ट्रॅक्टर पकडले, जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले पत्र

डी.आर.गिरीपुंजे।लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : तालुक्यातील रेतीघाटावरुन रेतीचा अवैध उपसा सुरुच, प्रशासनाची बघ्याची भूमिका या मथळ्याखाली लोकमतने १८ नोव्हेंबरला वृत्त प्रकाशीत करताच महसूल विभागात खळबळ उडाली.अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत तहसीलदारांना पत्र देऊन स्पष्टीकरण मागीतले आहे. पत्र हाती पडताच तहसीलदारांनी रेतीघाटावरुन रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर कारवाई केली.अप्पर जिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी १८ नोव्हेंबरला तिरोडा तहसीलदारांना पत्र देऊन लोकमतमध्ये प्रकाशीत बातमीचा आधार घेत त्यांच्याकडून यावर स्पष्टीकरण मागविले आहे. रेतीघाटावरुन रेतीचा अवैध उपसा सुरुच ही अतिशय गंभीर बाब असून यापूर्वी कार्यालयाने दिलेल्या पत्राची दखल न घेतल्याने स्थानिक वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित होत आहेत. सदर बातमीच्या अनुषंगाने योग्य चौकशी करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल त्वरीत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा तसेच याची प्रतिलिपी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना सादर करण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान तहसीलदारांच्या हाती हे पत्र पडताच एकच खळबळ उडाली. तालुका प्रशासन जागे झाले व दुसºयाच दिवशी १९ नोव्हेंबरला पहाटे वैनगंगा नदीतून रेतीची अवैध वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा केले. तालुक्यातील रेतीघाटावरुन रेतीची तस्करी सुरूच असल्याच्या लोकमतच्या वृत्ताला देखील दुजारो मिळाला. घाटकुरोडा येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून अवैध रेतीची वाहतूक करणाºया तीन ट्रॅक्टरवर महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करुन साडेतीन लाख रुपयाचा दंड ठोठावला. १९ नोव्हेंबरच्या पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीच्या पात्रातून रेती चोरी होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर नायब तहसीदलार राजेंद्र वाघचौरे, तलाठी आनंद भुते, वासुदेव जायभाये, अजय बिसेन, पोलीस कर्मचारी रोशन गोंडाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता वैनगंगा नदीपात्रात तीन ट्रॅक्टरमध्ये मजुरांकडून रेती भरतांना दिसून आल्याने पंचनामा करुन तिन्ही ट्रॅक्टर जप्त करुन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. यात रमन मेश्राम यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५/जी-७५३५ चा चालक रोहीत रुपचंद भोंगाडे, मनिष भांडारकर यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रंमाक एम. एच.३५ जे-२१२४ चा चालक रविंद्र मेश्राम, रक्षपाल भोंगाडे यांच्या मालकीचा विना नंबरचा ट्रॅक्टर चालक विलास डोंगरवार यांना ताब्यात घेऊन ट्रॅक्टर जप्त करुन तिरोडा येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. अवैध रेतीचा उपसा करण्यावर बंदी करण्यात यावी, तसेच घरकुलाकरीता लागणारी रेतीसाठी परवानगी देण्यात यावी अशी जनतेची मागणी आहे.

टॅग्स :sandवाळू