शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

तलावाचे सौंदर्यीकरण रखडले

By admin | Updated: May 2, 2015 01:47 IST

येथील रेल्वे स्थानक व भीमनगर दरम्यान विस्तीर्ण असे रेल्वे तलाव पसरले आहे.

गोंदिया : येथील रेल्वे स्थानक व भीमनगर दरम्यान विस्तीर्ण असे रेल्वे तलाव पसरले आहे. सध्या या तलाव परिसरात शहरातील घाण व कचरा घातला जातो. त्यामुळे दोन मिनिटेसुद्धा येथे थांबणे कठिण झाले आहे. या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे प्रस्ताव मागील पाच वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते. मात्र आतापर्यंत या प्रस्तावावर कसलीही कार्यवाही झाली नसल्याचेच समजून येते. याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम राज्य शासन करणार होते. पाच ते सहा वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांची बैठक झाली होती. त्यात सदर तलावाच्या सौंदर्यीकरणावर चर्चा होवून तसा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. गोंदिया रेल्वेला मिळालेल्या त्या प्रस्तावाची प्रत नागपूर डीआरएम कार्यालयाला पाठविण्यातही आली होती. मात्र सदर काम राज्य शासनाकडून होणार असल्याने पुढे काय झाले, याविषयी काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकाराला आता पाच ते सहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही सौंदर्यीकरण तर दूरच साधी सुधारणासुद्धा या तलावाची करण्यात आली नाही. यामागे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची उदासिनता असल्याचे बोलले जाते. सध्या या तलाव परिसरात शहरातील प्लास्टिक, पॉलिथिन, केरकचरा, घाण घातली जाते. त्यामुळे येथे नेहमीच डुकरांचा वावर राहत असून दुर्गंधाने ये-जा करणाऱ्यांना कासाविस झाल्यासारखे वाटते. उन्हाळा लागल्यावरही या तलावात पाणी आहे. परंतु ते पाणी घाणीमुळे खराब झाले आहे. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून या तलावाचे सौंदर्यीकरण केले तर तेथे एक उत्तम प्रेक्षणिय स्थळ बनू शकते. विद्युत प्रकाशाची व्यवस्था, तलाव परिसरात बगिचा, परिसराची स्वच्छता, नागरिकांच्या बसण्यासाठी सिमेंट खुर्च्यांची सोय, तलाव व तलाव परिसरात घाण व कचरा साचू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्यास या तलावाचे सौंदर्य फूलेल. शिवाय शहरातील नागरिक सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी किंवा विसाव्यासाठी येथे येवू शकतील. एकंदरीत हे तलाव शहराच्या सौंदर्यात भर घालणारे ठरू शकेल. मात्र पाच ते सहा वर्षांच्या काळात तीन ते चार जिल्हाधिकारी बदलून गेले. या काळात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. शिवाय लोकप्रतिनिधी व अनेक पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने कुणीही हा मुद्दा उचलून धरला नाही. त्यामुळे या रेल्वे तलावाचे सौंदर्यीकरणच विस्मरणात गेल्याचे दिसून येते. सध्या हे तलाव परिसर कचऱ्याचे माहेरघर असून डुकरांचे आश्रयस्थान बनले आहे. पूर्वी या तलावातील पाण्यावर हिरवे शेवाळ पसरले होते. त्यामुळे तलावातील पाणी दिसत नव्हते, केवळ वरून हिरवेगार शेवाळच दिसून येत होते. यानंतर या तलावाची एकदा स्वच्छता करून ते शेवाळ काढण्यात आले होते. मात्र त्यानंतर या तलावाच्या कामाकडे सातत्त्याने दुर्लक्ष करण्यात आले. (प्रतिनिधी)