शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पंकज यादववरील हल्ल्यामागे राजकीय वर्चस्वाची लढाई

By admin | Updated: March 25, 2015 01:20 IST

नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता पंकज यादव यांच्यावर आठ दिवसांपूर्वी झालेला हल्ला हा राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून झाला असून यामागील ‘मास्टरमाईंड’ दुसराच आहे.

गोंदिया : नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता पंकज यादव यांच्यावर आठ दिवसांपूर्वी झालेला हल्ला हा राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून झाला असून यामागील ‘मास्टरमाईंड’ दुसराच आहे. पोलिसांनी त्या मास्टरमाईंडला शोधून काढावे, अशी मागणी पंकज यादव यांचे कनिष्ठ बंधू नगरसेवक कल्लू उर्फ लोकेश यादव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केली. मंगळवारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या घटनेमागील पार्श्वभूमी सांगितली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शिव शर्मा, न.प.चे माजी उपाध्यक्ष भगत ठकरानी, बजरंग दलाचे सागर सिक्का, पुरनलाल यादव, राजकुमार यादव आदी उपस्थित होते.लोकेश यादव म्हणाले, गोंदियात गेल्या अनेक दिवसांपासून डुकरांचा त्रास सर्वच भागात आहे. सध्या स्वाईन फ्लूच्या भितीने सर्वांना ग्रासले आहे. त्यामुळे डुकरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. शहरात मोकाट डुकरांपासून होणारा त्रास दूर करण्यासाठी पंकज यादव किंवा मी (कल्लू) न.प.उपाध्यक्ष असताना पुढाकार घेतला होता. तेव्हापासून डुक्कर पालन करणाऱ्या समाजातील लोक आमचा राग करतात. मात्र आम्ही घाबरणार नाही. जनहितासाठी हा लढा सुरूच राहील, असेही ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)डुकरांच्या बंदोबस्ताचे निमित्तस्वाईन फ्लूमुळे डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन दबाव आणण्यात आला होता. याशिवाय हल्ल्याच्या २-३ दिवस आधीच यासंदर्भात अध्यक्षांनी बैठकही बोलविली होती. त्यावरून डुक्कर पालन करणाऱ्यांमध्ये आणि न.प.च्या सफाई कामगारांच्या नेत्यांमध्ये आमच्याबद्दल रोष आहे. याचाच फायदा घेत मास्टरमाईंड असलेल्या नेत्याने हल्लेखोरांना भडकवून हा हल्ला करविला, असा आरोप यादव यांनी केला.या प्रकरणातील हल्लेखोर युवक हे महाविद्यालयीन युवक आहेत. त्यापैकी एकाजवळ असलेली बाईक पोलिसांनी जप्त केली. त्या बाईकसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरायला त्याच्याकडे पैसे नाहीत. मग या प्रकरणात लढण्यासाठी नागपूरचा वकील आणण्यासाठी पैसे कुठून आले? असा सवाल करून या हल्ल्याची योजना आखणारा आणि त्यासाठी पैसे पुरविणारा दुसराच व्यक्ती असल्याचे यादव म्हणाले.पंकज यादव काही वर्षांपासून गुंडागर्दीसारख्या प्रकारापासून दूर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे न.प.मधील पक्षनेता, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, अखिल भारतीय यादव महासभेचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा दूध संघाचे संचालक, जिल्हा कुस्तिगीर संघाचे सचिव, दुर्गा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अशा विविध सामाजिक व राजकीय भूमिकेत आहे. त्यांचा संपूर्ण वेळ या कामात खर्च होत असताना त्यांचे अस्तित्व संपविण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याचे उपस्थितांनी सांगितले.आतातरी बंदोबस्त करा- शर्मायादव बंधूंच्या आई-वडिलांपासून त्यांच्या घरात सामाजिक कार्याची परंपरा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा यादव बंधूंनी डुकरांच्या बंदोबस्तासाठी घेतलेला पुढाकार हा कोणत्या समाजाविरूद्ध नसून नागरिकांच्या आरोग्यासाठीच आहे. त्यामुळे नगर परिषदेने आतातरी डुकरांचा योग्य बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शिव शर्मा यांनी यावेळी व्यक्त केली.