शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांच्या पोटाला चिमटा

By admin | Updated: October 25, 2015 01:45 IST

महागाई नियंत्रणात येण्याचे नाव घेत नसतानाच या महागाईने त्रस्त सर्वसामान्य लोकांना पोटाला चिमटा घेऊन राहावे लागत आहे.

वाढत्या महागाईने अडचणीत : तांदूळ-गहू साधारण, डाळी आवाक्याबाहेरगोंदिया : महागाई नियंत्रणात येण्याचे नाव घेत नसतानाच या महागाईने त्रस्त सर्वसामान्य लोकांना पोटाला चिमटा घेऊन राहावे लागत आहे. त्यांना दोन वेळचे जेवणही पोटभर घेणे दुरापास्त झाले आहे. महागाईच्या या काळात तांदूळ-गहू साधारण असले तरिही डाळी मात्र आवाक्याबाहेर झाल्या आहेत. अशात खायचे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे उभा ठाकला असून त्यांचे बजेट बिघडले आहे. आता दिवाळीचा सण साजरा तरी कसा करायचा असा सवाल सर्वसामान्य करीत आहेत. महागाईचे चक्र असे फिरत आहे की, चैनीच्या वस्तूंवर दिलासा मिळत असून खान्याच्या वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत. एकीकडे धानाला मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तर डाळीचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्य नागरिकांना आता आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. सध्याच्या या तेजीच्या बाजारात तांदूळ, गहू व तेलाचे भाव साधारण दिसून येत आहेत. वाढ असली तरिही यात साधारण वाढ होत असल्याने नागरिकांच्या पचणी पडत आहे. तांदळाचे भाव सध्या दोन हजार २०० रूपयांपासून तीन हजार ८०० रूपयांपर्यंत आहेत. यात गहू सुद्धा दोन हजार २०० ते दोन हजार ४०० रूपयांच्या घरात दिसून येत आहे. डाळीनी मात्र रेकॉर्ड ब्रेक तेजी घेतली आहे. तुरीची डाळ १८ हजारांच्या घरात पोहचली असून उडदाची डाळ १६ हजार रूपयांची घरात आहे. अशा या परिस्थितीत ग्राहकच काय तर व्यापाऱ्यांनाही फटका बसत असून डाळींची खरेदी करणारा ग्राहकच नसल्याचे धान्य विक्रेता संजय अमृते सांगतात. धान्यांच्या त्यातही डाळींच्या या सध्याच्या भावाकडे बघता सर्वसामान्यांचे दोन वेळचे जेवणच हिरावल्याचा हा प्रकार दिसून येत आहे. महागाईच्या या कचाट्यात सर्वसामान्यांनी दिवाळी साजरी कशी करायची असा सवाल जनता करीत आहे. (शहर प्रतिनिधी)