शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

खरीपातील नुकसान भरपाई न मिळाल्याने पीक विम्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 05:00 IST

मागील खरीप हंगामात १ लाख ९० हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. त्यातच ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे आणि त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसामुळे पीक विमाधारक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्याची तक्रार सुध्दा या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे केली. पण विमा कंपनीने केवळ ४१०० शेतकऱ्यांना मदतीस पात्र ठरवित ६१ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली.

ठळक मुद्देकोट्यवधी रुपयांचे नुकसान : शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र पीक विमा कंपनीने तीन वेगवेगळे निकष लावित ५६ हजार ६४० शेतकऱ्यांपैकी केवळ ४१०० शेतकऱ्यांना ६१ लाख रुपयांची मदत दिली. त्यामुळे रब्बी हंगामात केवळ ३३ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा काढला. नुकसान भरपाई मिळत नसल्यानेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.  मागील खरीप हंगामात १ लाख ९० हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. त्यातच ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे आणि त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसामुळे पीक विमाधारक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्याची तक्रार सुध्दा या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे केली. पण विमा कंपनीने केवळ ४१०० शेतकऱ्यांना मदतीस पात्र ठरवित ६१ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली. मात्र शेतकऱ्यांनी विमा हप्तापोटी २ काेटी २ लाख रुपये भरले. त्या तुलनेत मिळालेली भरपाई ही फारच अल्प आहे. विमा कंपनीचे धोरण अन शेतकऱ्याचे मरण हे धोरण खरे ठरत असल्यानेच शेतकऱ्यांनी पाठ फिरविली 

खरीप नुकसानीचे अनुदानखरीप हंगामात जिल्ह्यातील ५६ हजार ६४० शेतकऱ्यांनी २८ हजार ६०० हेक्टर क्षेत्राचा पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत विमा काढला होता. यासाठी विमा कंपनीकडे २ कोटी २ लाख रुपयांचा हप्ता भरला. पण विमा कंपनीने शेतकऱ्यांचे नुकसान होवून देखील त्या तुुलनेत नुकसान भरपाई दिली नाही. केवळ ६१ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली. त्यामुळे यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याकडे पाठ फिरविली आहे. 

शेतकऱ्याची प्रतिक्रियामागील खरीप हंगामात मी तीन एकर शेतीचा पीक विमा काढला होता. परतीचा पाऊस आणि कीडरोगांमुळे माझे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची तक्रार विमा कंपनीकडे केली होती. मात्र विमा कंपनीने परव्यासाठी तीन वेगळे निकष लावून केवळ मोजकीच मदत मंजूर केली. हीच स्थिती अनेकांची आहे. - विश्वानाथ हुकरे, शेतकऱ्याचे नाव

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती