शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

अस्ताव्यस्त पार्र्किं गला लगाम

By admin | Updated: October 3, 2015 01:35 IST

व्यापार नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया शहरातील अस्ताव्यस्त पार्किंगला आता लगाम लागत आहे.

३५ कार उचलल्या : दोन महिन्यात १०६ वाहनांवर कारवाईगोंदिया : व्यापार नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया शहरातील अस्ताव्यस्त पार्किंगला आता लगाम लागत आहे. पोलिस विभागातर्फे वाहतूक नियंत्रण शाखेला पहिल्यांदाच देण्यात आलेल्या दोन टोविंग व्हॅनने गेल्या २२ जुलैपासून आतापर्यंत १०६ वाहनांना उचलून नेले. यात ३५ कारचाही समावेश आहे. त्यामुळे कुठेही, कशाही कार पार्किंग करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या कारचालकांना लगाम बसला आहे. गोंदिया शहरातील रस्ते आधीच अरूंद आहेत. त्यात अनेक व्यापाऱ्यांनी रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे. त्यातच आतापर्यंत रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचा विचार न करता कारचालक बिनधास्तपणे रस्त्यावरच कार पार्क करून ठेवत होते. वाहतूक नियंत्रक पोलिसांकडे आतापर्यंत कारसाठी टोविंग व्हॅन किंवा कार जॅमर उपलब्ध नसल्यामुळे ते या वाहनांवर कारवाई करीत नव्हते. केवळ दुचाकी वाहनांवरच कारवाई होत होती. मात्र आता जड चारचाकी वाहनांना उचलून वाहतूक शाखेच्या कार्यालयात नेण्यासाठी पोलिस विभागाला दोन टोविंगव्हॅन उपलब्ध झाल्या आहेत. २२ जुलै रोजी एक तर १५ सप्टेंबर रोजी दुसरी टोविंग व्हॅन गोंदियात आली. वाहतूक पोलीस विभागाने या टोविंग व्हॅनचा वापर करून १०६ वाहने उचलून नेली आहेत. त्यात ३५ कार व ७१ दुचाकींचा समावेश आहे. टोर्इंग व्हॅनने उचललेल्या वाहनांवर मोटारवाहन कायद्यान्वये चलान करून आतापर्यंत प्रत्येक वाहनांवर चालकाकडून १०० रूपये दंड वसूल केला जात होता. परंतु आता टोविंगव्हॅनने उचललेल्या वाहनांवर दंड मोठ्या प्रमाणात वसूल केला जाईल. (तालुका प्रतिनिधी)दुचाकीला १०० तर कारला ४०० रुपये दंडटोविंग व्हॅनने उचललेल्या वाहनांवर किती दंड आकारावा यासाठी १२ सप्टेंबर २०१४ रोजी पोलीस उपअधीक्षक (गृह) यांनी दंडाची रक्कम ठरविली. मोटारवाहन कायदा १९८८ चे कलम १२७ च्या अधिन राहून हा दंड वसुल करण्याचे सूचविले. परंतु या दरानुसार आतापर्यंत कारवाई करण्यात आली नाही. ट्रक, ट्रेलर व टँकर या वाहनांना १००० रूपये दंड, टेम्पो ५०० रूपये, कार व जीप यांना ४०० रूपये तर दुचाकीला १०० रूपये दंड करण्याचे सूचविण्यात आले आहे.पावतीच छापली नाहीटोविंग व्हॅनने उचललेल्या वाहनांवर दंड आकारण्यासाठी वेगळी पावती बनविण्याचे पोलिस अधीक्षकांनी ठरविले. परंतु टोविंग व्हॅनसाठी वेगळी पावती पोलीस अधीक्षकांनी आतापर्यंत उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे वाहनांवर दुसऱ्या पावतीने दंड आकारण्यात येत आहे हे विशेष.