शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

नवीन विद्युत मीटरसाठी महावितरणची टाळाटाळ

By admin | Updated: November 13, 2014 23:05 IST

विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘हम करे सो कायदा’ असे म्हणत नागरिकांच्या नाकी नऊ आणले आहे. तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी व गंगाझरीचे शाखा अभियंता यांचे साटेलोटे

काचेवानी : विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘हम करे सो कायदा’ असे म्हणत नागरिकांच्या नाकी नऊ आणले आहे. तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी व गंगाझरीचे शाखा अभियंता यांचे साटेलोटे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बरबरपुरा येथील मनोहर कनोजे यांचा मुलगा मनोज याला दुसऱ्या गावात वीज मीटर देण्यास विद्युत विभाग टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.मुकेश कनोजे याने काचेवानी ग्रामपंचायतीच्या हद्दीत नवीन घर तयार केले. हे घर त्यांच्या आईच्या नावे असून तेथे नवीन मीटर लावून वीज पुरवठा सुरू करण्यासंबंधीचे प्रस्ताव दोन महिन्यापूर्वीच देण्यात आले होते. मात्र तिरोडा विद्युत वितरणचे उपविभागीय अधिकारी व गंगाझरी शाखेचे कनिष्ठ अभियंता अमित चवरे यांनी अनावश्यक कारणे समोर करून मीटर देण्यास टाळाटाळ करीत आहेत.बरबसपुरा ग्रामपंचायत अंतर्गत जि.प. शाळेजवळ मुकेशचे वडील मनोहर कनोजे यांच्या नावे पक्के घर आहे. तेथे वडिलांच्या नावेच वीज मीटर होता. मात्र तत्कालिन उपकार्यकारी अधिकारी ए.व्ही. तुरकर यांनी तपासणी करून अनावश्यक ८२ हजार रूपये व कंपाऊंड चार्ज ३० हजार रूपये आकारले. हे प्रकरण गोंदियाच्या ग्राहक न्यायालयात सुरू आहे. मात्र सदर दोन्ही अधिकारी वडिलांच्या नावे असलेला अनावश्यक वीज आकार भरा, तेव्हाच नवीन घराला मीटर मिळेल, असे सांगत असल्याचा आरोप मुकेशने केला आहे. मुकेशने सांगितल्यानुसार, बरबसपुरा येथे वडिलांच्या नावे असलेला वीज आकार न्यायालयाच्या निर्णयानंतर ते भरतील. ती त्यांची जबाबदारी आहे. किंवा तो भुर्दंड त्यांच्या संपत्तीतून वसूल करावा. त्याला आपला विरोध नाही. मात्र काचेवानीच्या ग्रामपंचायत हद्दीतील नवीन घराचा संबंध त्यांच्याशी येत नाही. तरीसुद्धा सदर दोन्ही अधिकारी हेतूपुरस्पर नाकह त्रास देवून मीटर देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मुकेशने केला आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत कनिष्ठ अभियंता अमित चवरे यांनी मीटर डिमांड दिले नाही आणि वीज पुरवठा सुरू केले नाही, तर आंदोलन सुरू करण्याचा इशारा कनोजे यांनी दिला आहे. (वार्ताहर)