शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

कटंगी प्रकल्पग्रस्तांचे आत्मदहन तात्पुरते मागे

By admin | Updated: May 1, 2016 01:39 IST

मध्यम प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे यांनी २८ शेतकऱ्यांसह १ मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

आमदारांनी केली मध्यस्ती : अधिकाऱ्यांची घेतली बैठक गोरेगाव : मध्यम प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे यांनी २८ शेतकऱ्यांसह १ मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यावरमात्र क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी मध्यस्ती करून अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावर कटंगी मध्यम प्रकल्पग्रस्तांनी तात्पुरते आत्मदहन मागे घेतले. तालुक्यातील कटंगी मध्यम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून शासनाद्वारे भुलथापा देऊन त्यांच्या मागण्यांबाबत टाळाटाळ केली जात आहे. सततच्या या टोलवाटोलवीला कंटाळून मध्यम प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे यांनी १ मे रोजी २८ प्रकल्पग्रस्तांनी घेऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता. यावर आमदार रहांगडाले यांनी शनिवारी (दि.३०) तहसील कार्यालयात बैठक घेतली.तहसीलदार कल्याण डहाट, पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे, कटंगी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे यांच्यासह शेतकरी व पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी, उपसभापती सुरेंद्र बिसेन, पंचायत समिती सदस्य पुष्पराज जनबंधू, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, जिल्हा महासचिव नितीन कटरे, जिल्हा परिषद सदस्य रोहीणी वरखडे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनंता ठाकरे, दिलीप येडे प्रामुख्याने बैठकीला उपस्थित होते. यावेळी आमदार रहांगडाले यांनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहून शासकीय, प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरून ना न्याय मिळवून देणार असे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले. आमदार रहांगडाले यांच्या मध्यस्ती व सर्व अधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दिलेले आश्वासन बघता प्रकल्पग्रस्तांनी महाराष्ट्र दिनी १ मे रोजी आत्मदहन करण्याचा पवित्रा मागे घेतला. तसेच आत्मदहन मागे घेण्याचे लिहून दिले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे आत्मदहन सध्यातरी टळÞले आहे. (तालुका प्रतिनिधी)