शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अस्वलाने केली टरबुजाची नासाडी

By admin | Updated: March 21, 2015 01:58 IST

तालुक्यातील कोकणा या गावात अस्वलाने चांगलाच धुमाकूळ घातला असून परिसरातील २५ एकरातील टरबुजांची नासाडी केली आहे.

सडक-अर्जुनी : तालुक्यातील कोकणा या गावात अस्वलाने चांगलाच धुमाकूळ घातला असून परिसरातील २५ एकरातील टरबुजांची नासाडी केली आहे. यात शेतकऱ्यांचे लाखो रूपयांची नुकसान झाले असून वन विभागाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. कोकणा हे गाव कोहमारा सहायक वनपरिक्षेत्रांतर्गत येते. गावालगत नवेगाव व्याघ्र असून प्रकल्पातील वन्य प्राणी गावाच्या दिशेने येवून उस, टरबुज, ढेमस आदी पिकांचे नासाडी करताना दिसतात. सध्या टरबुजाचे पीक तोडणीच्या मार्गावर असताना अस्वलांचा उपद्रव वाढला असून मोठमोठे टरबुज फोडणे व फेकण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. महागडी बियाणे व किटकनाशकांची फवारणी करुन टरबुजांचे भरघोस उत्पादन घ्यावे या बेतात शेतकरी आहे. अशात मात्र वण्यप्राण्यांकडून होत असलेल्या नासाडीमुळे लावलेला खर्च ही पाण्यात जात असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अस्वलाच्या उपद्रवामुळे कोकणा येथील टीकाराम पाऊलझगडे, रेवदास दरवडे, कोंडू भेंडारकर, गणपत कापगते चैतराम शहारे, गणपत पाऊलझगडे, डॉ. श्याम दीक्षित, शिवाजी गहाणे, शेमराज भेंडारकर, व्यंकट रहेले, भास्कर भेंडारकर मोतीराम पाऊलझगडे, मनोहर पाऊलझगडे, चोपराम गहाणे आदी अनेकांच्या पिकाची नासाडी झाली.