शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
5
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
6
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
7
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
8
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
9
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
10
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
11
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
12
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
13
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
14
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
15
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
16
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आणखी ४३ कोरोना बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:01 IST

आमगाव तालुक्यातील शिवणटोला व कुणबीटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण, पदमपूर येथे दोन रुग्ण आणि आमगाव येथे चार रुग्ण, सालेकसा तालुक्यात ११ रुग्ण आढळले आहेत. यात गोरे येथे तीन, चेहारीटोला, तिरखेडी, मुरूमटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण, धानोली येथे दोन व तीन रुग्ण सालेकसा येथे आढळून आले आहे.

ठळक मुद्दे८ कोरोना बाधितांची कोरोनावर मात : २७७ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तर कोरोना बाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी (दि.१०) जिल्ह्यात पुन्हा ४३ कोरोना बाधितांची भर पडली. आठ कोरोना बाधित कोरोामुक्त झाले. जिल्ह्यातील एकूण कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या २७७ वर पोहचली आहे. तर एकूण कोरोना बाधितांचा आकडा ६४३ वर पोहचला असून यापैकी ३३२ कोरोना बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.सोमवारी आढळलेल्या एकूण ४३ कोरोना बाधितांमध्ये गोंदिया शहरात ११ रुग्ण आढळले आहे. यात शास्त्री वॉर्ड, रेल्वे कॉलनी, सिव्हिल लाईन, वसंतनगर येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि सात रुग्ण हे भीमनगर येथील आहेत. सडक अर्जुनी तालुक्यात आठ रुग्ण आढळून आले असून पांढरवाणी, केसलवाडा व मंदिटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण आणि सौंदड येथे पाच रुग्ण, तिरोडा तालुक्यात पाच रुग्ण आढळले असून यामध्ये सरांडी, बिरसी येथे प्रत्येकी दोन व एक रुग्ण हा खोडगाव येथील आहे.आमगाव तालुक्यातील शिवणटोला व कुणबीटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण, पदमपूर येथे दोन रुग्ण आणि आमगाव येथे चार रुग्ण, सालेकसा तालुक्यात ११ रुग्ण आढळले आहेत. यात गोरे येथे तीन, चेहारीटोला, तिरखेडी, मुरूमटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण, धानोली येथे दोन व तीन रुग्ण सालेकसा येथे आढळून आले आहे.तर कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये गोंदिया तालुक्यातील असून मुंडीपार, सेजगाव व गोंदिया शहरातील रेलटोली येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि गोंदियाच्या सिंधी कॉलनीतील एक रुग्ण आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील हलबीटोला येथील एक रुग्ण, देवरी तालुक्यातील भागी आणि परसटोला येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि एक रुग्ण हा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील आहे.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत गोंदिया येथील प्रयोगशाळेत ११ हजार २४८ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी ६४३ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. १० हजार ४०० नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.१४९ नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून अद्याप प्राप्त व्हायचा आहे. तर १६८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप अनिश्चित आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरीत शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात ४७८९ व्यक्तींचे स्वॅब नमुने घेण्यात आले.यामध्ये ४६८२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.१०७ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १९६ चमू आणि १०९ सुपरवायझर ९१ कंटेन्मेंट झोनसाठी नियुक्त करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या