शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

वेतन निश्चिती विना सुरू आहे कर्मचाऱ्यांना वेतन वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST

महाराष्ट्र शासनातर्फे१ जानेवारी २०१९ पासून सर्व राज्य कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्यानुसार गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत विविध विभागातील कर्मचाºयांची वेतन निश्चिती सातव्या वेतन आयोगनुसार करण्याचे निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आले. विभाग प्रमुखांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील कर्मचाºयांची वेतन निश्चिती लिपिकांनी आपल्या ज्ञानानुसार केलेली आहे.

ठळक मुद्दे जि.प.लेखा विभागाचे दुर्लक्ष : अतिरिक्त वेतनाचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला असला तरी वेतन आयोगानुसारची वेतन निश्चिती ही मुख्य लेखा अधिकाऱ्यांकडून मंजूर करवून न घेतल्याने कर्मचाºयांना अधिकचे वेतन वाटप केले जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे.महाराष्ट्र शासनातर्फे१ जानेवारी २०१९ पासून सर्व राज्य कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्यानुसार गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत विविध विभागातील कर्मचाºयांची वेतन निश्चिती सातव्या वेतन आयोगनुसार करण्याचे निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आले.विभाग प्रमुखांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील कर्मचाºयांची वेतन निश्चिती लिपिकांनी आपल्या ज्ञानानुसार केलेली आहे. मात्र या वेतन निश्चितीत अनेक घोडचुका कायम आहेत. गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने येथील कर्मचाºयांना एकस्तर वेतन संरचना लागू होती. एकस्तरच्या त्याच मुळ वेतनावर अनेक कर्मचाºयांची वेतन निश्चिती करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाºयांना प्रत्येकी सहा ते दहा हजारपर्यंत अधिकचे वेतन दरमहा मिळत आहे. अनेक विभागातील कर्मचाºयांच्या मुळ वेतनाची अनेक प्रकरणे अद्याप प्रलंबित आहे. वेतन कमी होऊ नये म्हणून चुकीच्या पद्धतीने वेतन निश्चिती करण्यात आली आहे. कर्मचाºयांना वरिष्ठ वेतन श्रेणी, एकस्तर वेतन श्रेणी अशा वेतन निश्चिती प्रलंबित असताना विद्यमान वेतन श्रेणी वरच वेतन निश्चिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कर्मचाºयांच्या सेवा पुस्तिकावरील सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीला अद्यापही लेखा विभागाकडून प्रमाणित न केल्यामुळे वाढीव वेतन वाटप सुरू आहे. सदर चुकीच्या वेतन निश्चितीमुळे अनेक कनिष्ठ कर्मचाºयांना वरिष्ठ अधिकारी, कर्मचाºयांपेक्षा अधिक वेतन प्रदान केले जात आहे. एकस्तर वेतन संरचनेमुळे अधिक वेतन मिळत असल्याने पात्र असूनही अधिकारी त्यांना चटोपाध्याय वेतनश्रेणी (वरिष्ट वेतन श्रेणी) लागू करण्यात वेळकाढूपणा करीत असल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागातील अनेक कर्मचाºयांच्या सेवापुस्तिकेवर लेखा विभागाची अद्याप स्वाक्षरी न झाल्याने त्यांना नियमबाह्यपणे वेतन वाटप सुरू आहे. सदर नियमबाह्य व अप्रमाणित वेतन वाटपामुळे शासनाच्या तिजोरीवर दरमहा कोट्यवधी रुपयांचा अनावश्यक भार पडत आहे. सर्व विभागातील सर्व कर्मचाºयांच्या सेवा पुस्तिकेवर लेखा विभागामार्फत तपासणी करून मंजुरी करण्याची मागणी लोकप्रतिनिधीनी केली आहे. मनुष्यबळाअभावी लेखा विभागाद्वारे सुद्धा कर्मचारी सेवा पुस्तिका तपासणी करण्यात कुचराई केली जात असल्याची माहिती आहे. दरम्यान कर्मचारी नियमबाह्य वेतन वाटप प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद