शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याणच्या तिन्ही शाळा होणार डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेतील कामांना प्रशासकीय मान्यता देऊन अर्थसंकल्पीत निधी या शाळांना डिजीटल करण्यासाठी जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिला आहे. गोंदिया जिल्ह्यातील विशेष समाज कल्याण विभागाला नाविन्यपूर्ण योजनेकरीता ३ टक्के निधी म्हणजे १ कोटी ३० लाख ४४ हजार रूपये शासनाने मंजूर केले आहे.

ठळक मुद्देप्रत्येक शाळेला टेलिस्कोप : खर्च केले ४० लाख ५५ हजार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील ३ शासकीय निवासी शाळा डिजीटल होत आहेत. त्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ४० लाख ५५ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत.अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेतील कामांना प्रशासकीय मान्यता देऊन अर्थसंकल्पीत निधी या शाळांना डिजीटल करण्यासाठी जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिला आहे. गोंदिया जिल्ह्यातील विशेष समाज कल्याण विभागाला नाविन्यपूर्ण योजनेकरीता ३ टक्के निधी म्हणजे १ कोटी ३० लाख ४४ हजार रूपये शासनाने मंजूर केले आहे. या पैशातूनन ४० लाख ५५ हजार रूपये गोंदिया जिल्ह्यात विशेष समाज कल्याण विभागाच्या जिल्ह्यात तीन शाळांना दिले आहे. त्या तिन्ही शाळा डिजीटल करण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे. तिरोडा तालुक्याच्या सरांडी येथे असलेली मुलींची शासकीय निवासी शाळेला १३ लाख २५ हजार,सडक-अर्जुनी तालुक्याच्या डव्वा येथे असलेली मुलींची शासकीय निवासी शाळेला १३ लाख २५ हजार तर गोंदियाच्या नंगपूरा मूर्री येथे असलेली मुलांची शासकीय निवासी शाळेला १३ लाख २५ हजार रूपये देण्यात आलेत. तांत्रीक व्यवहार व तपासणीकरीता ७९ हजार ५०० रूपये दिले.मागावर्गीयांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनाने विशेष समाज कल्याणच्या जिल्ह्यात असलेल्या तिन्ही शाळा डिजीटल करण्यास सुरूवात केली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ह्या सर्व शाळा डिजीटल होतील.आकाशातील ग्रह ताऱ्यांच्या अभ्यासासाठी टेलिस्कोपजिल्ह्यातील ह्या तिन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना आकाशातील ग्रहताºयांचा अभ्यास करता यावा ते पाहून विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचा अभ्यास व्हावा यासाठी प्रत्येक शाळेला एक लाख रूपये किंमतीचा टेलिस्कोप देण्यात आला आहे. त्या टेलीस्कोपला विद्यार्थी हाताळतात.आधुनिकीकरणाच्या काळात खासगी शाळांच्या तुलनेत समाज कल्याणच्या शाळा कुठेही मागे राहू नयेत यासाठी जिल्ह्यातील तिन्ही शाळा डिजीटल करणे सुरू आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत डिजीटल काम पूर्ण होणार आहे.- मंगेश वानखेडे, समाज कल्याण उपायुक्त गोंदिया.