शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

सव्वा चार कोटींची औषधांची देयके थकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 6:00 AM

केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचे हस्तांरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे करण्यात आले. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयाला सार्वजनिक आरोग्य विभागाकडून औषधी खरेदीसाठी मिळणारा निधी मिळणे बंद झाले. त्यामुळे रुग्णांना औषध पुरवठा करण्याची जवाबदारी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयावर आली.

ठळक मुद्देमेडिकलमधील प्रकार : तीन वर्षांपासून केवळ प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला औषधांचा पुरवठा करणाऱ्या औषध विक्रेत्यांचे सव्वाचार कोटी रुपयांचे देयके मागील तीन वर्षांपासून थकले आहेत. शासनाकडून यासाठी अद्यापही निधी न मिळल्याने औषध विक्रेते त्रस्त झाले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अडचणीत वाढ झाली आहे.केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचे हस्तांरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे करण्यात आले. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयाला सार्वजनिक आरोग्य विभागाकडून औषधी खरेदीसाठी मिळणारा निधी मिळणे बंद झाले. त्यामुळे रुग्णांना औषध पुरवठा करण्याची जवाबदारी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयावर आली. यासाठी महाविद्यालयाने २०१६ ते २०१८ या कालावधीत रुग्णांना औषध देण्यासाठी स्थानिक स्तरावर खरेदी केली.या दरम्यान जवळपास ४ कोटी २४ लाख रुपयांची औषध खरेदी करण्यात आली. यानंतर शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना औषधांचा पुरवठा करण्यासाठी हॉपकिन्स कंपनीशी करार केला. याच कंपनीकडूनच औषधांचा पुरवठा सुरू झाला. मात्र यापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने स्थानिक स्तरावर खरेदी केलेल्या ४ कोटी २४ लाख रुपयांची देयके मागील तीन वर्षांपासून शासनाने अदा केली नाही. यासाठी महाविद्यालयाने शासनाकडे वांरवार पाठपुरावा केला. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. कोट्यवधी रुपयांच्या देयकांसाठी औषध विक्रेते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायºया झिजवित आहे. त्यातच बरेचदा हॉपकिन्स कंपनीकडून औषधांचा पुरवठा होण्यास विलंब होतो. अशावेळी महाविद्यालयाला स्थानिक स्तरावरुन औषधी खरेदी करावी लागते. मात्र औषध विक्रेत्यांचे आधीचेच ४ कोटी २४ लाख रुपयांचे देयके थकले आहेत. त्यामुळे हे औषध विक्रेते पुन्हा उधारीवर औषधी देण्यास नकार देत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुध्दा चांगलीच अडचण झाली आहे. दरम्यान बरेचदा गोरगरीब रुग्णांना बाहेरुन औषधी आणून आपली गरज भागवावी लागत आहे.शासनाकडून निधी न मिळाल्याचा फटका गोरगरीब रुग्णांना बसत आहे.हॉपकिन्सचे देयक थकलेशासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना औषधांचा पुरवठा करण्यासाठी हॉपकिन्स कंपनीशी करार केला आहे. या कंपनीकडून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ४ कोटी ५० लाख रुपयांची औषधी खरेदी केली आहे. मात्र यापैकी शासनाने आतापर्यंत केवळ दीड कोटी रुपयांचा निधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिला आहे.प्रभारी अधिष्ठातावर कारभार किती दिवसगोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला मात्र अद्यापही येथे स्थायी अधिष्ठाताची नियुक्ती करण्यात आली नाही. परिणामी येथील कारभार प्रभारी अधिष्ठाताच्या भरोश्यावर सुरू आहे. यामुळे निर्णय घेतांना सुध्दा अडचण जात आहे. येथे स्थायी अधिष्ठाताची नियुक्ती केव्हा करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.सन २०१६ ते २०१८ दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने खरेदी केलेल्या औषधीचे ४ कोटी २४ लाख रुपयांची देयके शासनाकडून अद्यापही मिळाली नाही. यासंदर्भात शासनाकडे सातत्याने पत्र व्यवहार करण्यात आला. तर हॉपकिन्स कंपनीचे सुध्दा दीड कोटी रुपयांचे बिल थकले आहे.- डॉ.व्ही.पी.रुखमोडे,प्रभारी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

टॅग्स :medicinesऔषधं