शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

अकोला येथील दोघे आमगाव पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: August 3, 2014 23:27 IST

नकली नोटा चलनात आणणाऱ्या अकोला येथील दोघांना आमगाव पोलिसांनी चौकशीसाठी आपल्या ताब्यात घेतले आहे. शिवाजी गणपत भुतेकर (२८) रा. देगाव ता.बिसोड जि. अकोला, मनोज दीपक पवार

नकली नोट प्रकरण : मुख्य आरोपीला हृदयविकाराचा झटकागोंदिया : नकली नोटा चलनात आणणाऱ्या अकोला येथील दोघांना आमगाव पोलिसांनी चौकशीसाठी आपल्या ताब्यात घेतले आहे. शिवाजी गणपत भुतेकर (२८) रा. देगाव ता.बिसोड जि. अकोला, मनोज दीपक पवार (२७) रा. गंगानगर एम पी गार्डन हॉटेलच्या मागे अकोला अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.आमगाव येथील नैवेद्यम रेस्टॉरेंटचे मालक प्रल्हाद सुरेशप्रसाद दुबे (५०) व नवीन कृष्णकुमार असाटी (२६), दोघेही रा.आमगाव या दोघांनी मागील अनेक दिवसांपासून नकली नोटा चलनात आणण्याचा व्यवसाय सुरु केला होता. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली व आमगाव पोलिसांनी ५ जुलैच्या सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास सापळा रचून येथील बाजार चावडी येथे त्या दोघांना संशयास्पद हालचाली करताना पकडले. त्यांची अंगझडती घेतल्यावर दोघांजवळून ५०० रुपयांच्या ३४ नकली नोटा हस्तगत करण्यात आल्या. त्यात प्रल्हाद दुबेजवळ ११ नोटा (सिरीज क्रमांक ५ डीडी ५९८७८८) व ९ नोटा (सिरीज क्रमांक ९ बीके ९७६६५९) या एकाच सिरीजच्या आढळल्या तर नवीन असाटी याच्याकडे असलेल्या १४ नोटांपैकी ८ नोटा (५ डीडी ५९८७८८), ३ नोटा (९ बीके ९७६६५९) व ६ नोटा (४ एचजी ५८६३७४) या सिरीजच्या आहेत. १७ हजार रुपयांच्या ३४ नकली नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या. त्यांच्याविरूध्द भादंविच्या कलम ४८९ ब, ४८९ क, १२० ब अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यांंनी पोलीस कोठडीत अकोला येथे अटक झालेल्या तिघांची माहिती दिली होती. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्या दोघांना न्यायालयाने ६ आॅगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक पवार याला ह्दयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्याला तुरूंगातील रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन पवार करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)