शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा तीन गावांनी केली गावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 06:00 IST

देशात आणि राज्यात कोरोना आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र लॉक डाऊनचे चित्र आहे. ग्रामीण भागात सुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाय योजना करीत आहेत. स्थानिक ग्रामपंचायतींनी सुध्दा यासाठी पुढाकार घेतला असून गावात डासनाशक फवारणी व स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना : गावकरी होत आहेत सजग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपल्या गाव परिसरात कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गावकरीच पुढाकार घेत आहेत. बुधवारी गोरेगाव तालुक्यातील दोन गावांनी गावबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर गुरूवारी पुन्हा जिल्ह्यातील तीन गावांनी गावबंदीचा निर्णय घेत गावात प्रवेश करणाऱ्या मार्गावर लाकडे आणि झाड्याच्या फांद्या टाकून मार्ग बंद केला.देशात आणि राज्यात कोरोना आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र लॉक डाऊनचे चित्र आहे. ग्रामीण भागात सुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाय योजना करीत आहेत. स्थानिक ग्रामपंचायतींनी सुध्दा यासाठी पुढाकार घेतला असून गावात डासनाशक फवारणी व स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे.गुरूवारी (दि.२६) तिरोडा तालुक्यातील चांदोरी येथील गावकऱ्यांनी गावबंदीचा निर्णय घेत बिहिरीया ते चांदोरी रोड व बिहिरीया ते चांदोरीटोला हे दोन्ही रस्ते बंद केले. तसेच गावात परवानगी न घेता येणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय पोलीस पाटील महानंद पानतावने,सरपंच मदनलाल पटले,उपसरपंच गणेश मेश्राम यांनी घेतला. तर सडक अर्जुनी तालुक्याती बाम्हणी खडकी येथील गावकºयांनी देखील गुरूवारपासून गावबंदी लागू केली.यासाठी गावात प्रवेश करणाºया मार्गावर लाकडे व झाडाच्या फांद्या टाकून मार्ग बंद केला. तसेच कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असून या नियमाचे उल्लघंन घेणाऱ्यावर कारवाही करण्याचा निर्णय सरपंच प्रतिमा कोरे, माजी सभापती विशाल शिवणकर, सोनू खोटेले, मुन्ना ठाकूर,प्रदीप सोनुले,जितेश मेश्राम, नोव्हील हत्तीमारे यांनी घेतला. देवरी तालुक्यातील सिरपूबांध येथील गावकऱ्यांनी सुध्दा गुरूवारी गावबंदीचा निर्णय घेत गावात प्रवेश करणारा मार्ग बंद केला. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गावकरी सुध्दा आता सजग होत असून गावबंदीचा निर्णय घेत आरोग्याची काळजी घेत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस