शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा संततधार

By admin | Updated: August 4, 2014 23:48 IST

रविवारपासून संततधार पाऊस बरसत असल्याने जिल्हा पुन्हा एकदा जलमय झाला आहे. आठही तालुक्यांत या पावसाची नोंद केली जात असून देवरी व सडक अर्जुनी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.

वृद्ध वाहून गेला : धरणांची दारे उघडली, मार्ग बंदगोंदिया : रविवारपासून संततधार पाऊस बरसत असल्याने जिल्हा पुन्हा एकदा जलमय झाला आहे. आठही तालुक्यांत या पावसाची नोंद केली जात असून देवरी व सडक अर्जुनी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या पावसात देवरी तालुक्यात एक वृद्ध वाहून गेला आहे. तर जिल्ह्यातील तीन प्रमुख प्रकल्पांचे गेट उघडण्यात आले आहेत. काही भागात घरांच्या पडझडीच्या घटनाही पुढे येत आहेत.मागील महिन्यात बरसलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यात चांगलाच कहर केला होता. प्राणीहानी सह मोठ्या प्रमाणात नुकसानी या पावसामुळे झाली होती. त्यानंतर काही दिवसांची उसंत घेतल्यानंतर रविवारपासून (दि.३) संततधार पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात हा पाऊस बरसत असल्याची नोंद आहे. गोंदिया- तालुक्यात रविवारपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसामुळे काही प्रमाणात जनजिवन विस्कळीत झाले असतानाच अन्य काही नुकसान झाले नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यात सकाळ पर्यंत १४ मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. तिरोडा- तालुक्यात रविवारच्या रात्रीपासून पाऊस बरसत असून सकाळ पर्यंत २८ मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. या पावसामुळे काहीच परिणाम जाणवला नसून नुकसान झालेले नाही. गोरेगाव- संततधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. तालुक्यात सकाळपर्यंत १४.३ मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून या संततधार पावसामुळे नदी नाल्यांची धोक्याची पातळी ओलांडली आहे. मात्र वृत्त लिहेपर्यंत नुकसानीची माहिती नव्हती. देवरी- तालुक्याला रविवारपासून पावसाने चांगलेच झोडपून क ाढले असून सोमवारी सकाळ पर्यंत ८६ मिमी. पाऊस बरसला होता. यामुळे तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले असून बेलारगोंदी नाल्यात सोमवारी दुपारी १२.३० वाजता दरम्यान उदाराम शंकर चांदेवार (६०,रा.शेरपार) हे वाहून गेले. त्यांचा मृतदेह हाती लागला नसल्याने १५ पोलीस कर्मचारी व ३० सी-६० चे जवान शोधकार्यात लागले होते. चांदेवार देवरी येथून आपल्या गावी जाण्यासाठी निघाले असताना पुलावरून पाणी वाहात होते. त्यांना काही लोकांना रोखण्याचाही प्रयत्न केला होता.आमगाव- तालुक्यात शनिवारच्या रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे जनजिवन प्रभावीत झाले नाही. शिवाय कुठल्याही प्रकारच्या नुकसानीची घटना घडलेली नाही. सडक अर्जुनी- रविवारपासून पाऊस बरसत आहे. मात्र पावसाची रिपरिप सुरू असल्याने कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. तरिही तालुका प्रशासन नजर ठेऊन आहे. तालुक्यातील कोणताही रस्ता बंद झालेला नसल्याची माहिती आहे. अर्जुनी मोरगाव- रविवारपासून पाऊस सुरू असला तरिही पावसाची रिपरिप असल्याने तालुक्यात काहीच नुकसान झालेले नाही. शिवाय अद्याप पंधरवड्यानंतर दमदार पाऊस आल्यामुळे शेतकरी वर्गात आनंद दिसून येत आहे. तर इटियाडोह धरणातून एक हजार क्यूसेक्स पाण्याचा सिंचनासाठी विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील सर्व रस्ते सुरळीत सुरू असून कुठल्याही नुकसानीची नोंद नाही. (प्रतिनिधींकडून)