शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय भवनाचे काम सहा महिन्यांपासून ठप्प

By admin | Updated: April 27, 2015 00:27 IST

सर्व प्रशासकीय कार्यालये एकाच इमारतीत ठेवण्याचे स्वप्न उराशी बाळगून यासाठी निधी उपलब्ध करविण्यात आला.

शासनाकडून निधीच नाही : कंत्राटदाराची दीड कोटींची बिले थकीतसालेकसा : सर्व प्रशासकीय कार्यालये एकाच इमारतीत ठेवण्याचे स्वप्न उराशी बाळगून यासाठी निधी उपलब्ध करविण्यात आला. मोठ्या जोमात प्रशासकीय भवनाचे काम सुरू करण्यात आले. मात्र सत्ता परिवर्तन झाले व सत्ते आलेल्यांच्या मनात परिवर्तन झाले. त्यांच्या मनातील हे परिवर्तन तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय भवनाच्या कामावरही स्पष्टपणे दिसून येत आहेत. सालेकसाच नव्हे तर देवरी व आमगाव येथील तहसील कार्यालयांचेही काम मागील सहा महिन्यांपासून बंद पडून आहे. यांचे काम कधी सुरू होणार याची साधी माहितीही देण्यासाठी कुणी तयार नसल्याचे चित्र आहे. येथील तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय भवनाचे बांधकाम जून २०१४ मध्ये सुरू करण्यात आले. तीन कोटी ९६ लाख रूपयांच्या निधीतून या भवनाचे बांधकाम करण्यात येणार आहे. कंत्राटदाराने मोठ्या जोमाने हे बांधकाम सुरू केले होते व हे बघता १ मे पर्यंत या प्रशासकीय भवनाचे उद्घाटन व्हायला हवे होते. मात्र बील न निघाल्याने कंत्राटदाराने काम बंद पाडले आहे. परिणामी या भवनाचे बांधकाम अडकून पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शासनाकडून आतापर्यंत एक कोटी रूपयेच मिळाले आहेत. त्यातही विशेष गोष्ट अशी की, मार्चनंतर नवीन वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या बजटमध्ये या कामासाठी निधीचा प्रावधान करण्यात आलेला नाही. अशात भविष्यातही या कामासाठी निधी मिळणार की नाही याबाबत सांगण्यास कुणीही तयार नाही. (प्रतिनिधी)कंत्राटदाराचे दीड कोटींचे बिल अडकून शासनाने नवीन बांधकामासाठी मागील सहा महिन्यांपासून निधी उपलब्ध करून दिला नाही. एवढ्यावरही कंत्राटदाराने आपल्याकडील रक्कम लावून काम पुढे वाढविले. मात्र आता कंत्राटदाराचे दीड कोटींचे बील शासनाकडे पडून आहेत. यामुळे कंत्राटदाराने बांधकाम बंद पाडले. शिवाय नवीन वर्षाच्या बजेटमध्ये नवीन कामांसाठी निधीचे प्रावधान करण्यात आलेले नाही. अशात जुने बील अडकून पडले असताना कंत्राटदार काम सुरू करणार नाही. कारण त्याचे जुने पैसे अडकून पडले आहेत.