शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

३.३० कोटींच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी

By admin | Updated: June 29, 2017 00:53 IST

जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात इटियाडोह येथे निर्मित मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात इटियाडोह येथे निर्मित मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या नूतनीकरणासाठी ३.३० कोटींच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू असून आता प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे सदर केंद्राचे चांगले दिवस लवकरच येणार असल्याचे समजते. इटियाडोह मत्स्यबीज उत्पादन केंद्र केवळ गोंदिया जिल्ह्यातच नव्हे तर छत्तीसगड व विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील तलावांमध्ये मासोळ्यांचे उत्पादन करण्यासाठी मत्स्यबीजांचा पुरवठा करतो. हे मत्स्यबीज केंद्र जिल्ह्यातीलच नव्हे तर अनेक जिल्ह्यातील मत्स्यमारीला निर्भरता प्रदान करते. मात्र त्याच्या विकासाकडे लक्ष देण्यात आले नाही. विलंबाने का असेना परंतु शासनाचे कृषी पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभाग व मत्स्य व्यवसाय विभाग आता झोपेतून जागे झाले व या विभागाने सदर केंद्राच्या नूतनीकरणासाठी ३.३० कोटींच्या खर्चाची योजना बनविली आहे. सदर मत्स्यबीज केंद्र सुरू होवून मोठा कालावधी लोटला. स्थानिक मत्स्यमारांच्या सहकार्याने एका संस्थेच्या माध्यमातून त्याला संचालित केले जाते. शासनाने राज्यातील चार मत्स्यबीज उत्पादन केंद्रांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात इटियाडोहाचाही समावेश आहे.