शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या ‘वेट ॲन्ड वाॅच’ने शेतकऱ्यांच्या काळजीत भर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:27 IST

गोंदिया : रब्बीतील धान खरेदी केंद्र सुरू करण्याकरिता जिल्हा प्रशासन आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने अजूनही ‘वेट ॲन्ड वाॅच’चे धोरण ...

गोंदिया : रब्बीतील धान खरेदी केंद्र सुरू करण्याकरिता जिल्हा प्रशासन आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने अजूनही ‘वेट ॲन्ड वाॅच’चे धोरण अवलंबिले आहे. दुसरीकडे खरीप हंगामातील कामे सुरू करण्याची वेळ आली आहे. रब्बीतील धानाची कापणी आणि मळणी करून मोकळे होण्याचा शेतकरी विचार करीत आहे., तर दुसरीकडे प्रशासनाच्या भूमिकेने शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडत आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात कधी नव्हे ते यंदा तब्बल ६६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा, अनुकूल वातावरणामुळे खरिपापेक्षा रब्बीचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. जवळपास २५ ते ३० लाख क्विंटल धानाचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रब्बीतील धानाची कापणी जळपास आटोपत आली आहे. काही शेतकऱ्यांनी धानाची मळणीसुध्दा केली आहे; पण शासकीय धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांना १,३०० ते १,४०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे धानाची विक्री करावी लागत आहे. आधीच मागील वर्षीपासून कोरोना संकटाला तोंड देत असून, त्यातच यंदा खते आणि बियाणे यांच्या किमतीमध्ये चारपट वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यातच रब्बीतील धान खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची अधिक कोंडी झाली आहे.

खा. प्रफुल्ल पटेल यांनी खरिपातील धानाची त्वरित उचल होऊन रब्बीतील खरेदीला सुरुवात व्हावी, यासाठी शासन स्तरावर यशस्वी पाठपुरावा केला. त्यामुळेच राइस मिलर्स आणि शासन यांच्यातील तिढा सुटून राइस मिलर्सने धानाची भरडाईसासाठी उचल करण्याची तयारी केली आहे. मात्र यानंतर जिल्हा प्रशासनाकडून धानाची भरडाईसाठी युध्दपातळीवर उचल करण्यासाठी कुठल्याच हालचाली सुरू नाही. आधीच यंदा रब्बीतील धान खरेदीला विलंब झाला आहे. त्यातच रब्बीतील धान खरेदीची मुदत संपण्याची वेळ येत आहे. मात्र यानंतर प्रशासन बिनधास्त आणि शेतकऱ्यांच्या काळजीत दिवसागणिक भर पडत आहे. शासनाच्या आदेशानंतरही प्रशासनाला आता नेमक्या कुणाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे की कुणाच्या दर्शनाची वाट आहे हे मात्र कळायला मार्ग नाही.

......

अर्धे शेतकरी व्यापाऱ्यांच्या दारात

मे महिना अर्धा संपत आला तरी अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही, तर खरीप हंगामाला सुरुवात होण्यास महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. रब्बीतील मळणी केलेले धान ठेवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या घरी जागा नाही. तर या धानाची विक्री करून खरिपासाठी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट न पाहत आहे. गरजेपोटी कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धान विकून मोकळे होत आहे. त्यामुळे रब्बीत चांगले उत्पादन होऊन त्याची योग्य किमत मिळण्यापासून शेतकरी वंचित राहत आहे.

......

नियोजनाचा अभाव

जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेता त्वरित रब्बीतील धान खरेदीला सुरुवात करण्याची गरज आहे. यासाठी वेळ पडली तर खासगी गुदामे भाड्याने घ्यावे, पण युध्दपातळीवर रब्बीतील धान खरेदी सुरू करावी. मात्र प्रशासन केवळ हातावर हात ठेवून प्रतीक्षा करीत आहे. यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे.