शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून सुरू होणार अतिरिक्त विशेष प्रवासी रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूरचे रेल्वे प्रबंधक यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार ३ गाड्या तिरोडा, गोंदिया आणि आमगाव रेल्वे स्थानकावरून सुटण्याचे व येण्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे.

ठळक मुद्दे३ गाड्यांचे वेळापत्रक निश्चित : गोंदिया, तिरोडा व आमगाव येथे थांबा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी सोमवारपासून (दि.१) गैर श्रमीक नियमित रेल्वे गाड्या सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूरचे रेल्वे प्रबंधक यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार ३ गाड्या तिरोडा, गोंदिया आणि आमगाव रेल्वे स्थानकावरून सुटण्याचे व येण्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे.गाडी क्रमांक ०२८३३ अहमदाबाद-हावडा ही गाडी तिरोडा येथे १९.२५ वाजता पोहोचून १९.२७ वाजता निघणार, १९.५८ वाजता गोंदिया येथे पोहोचून २० वाजता गोंदिया येथून निघणार व आमगाव येथे २०.१५ वाजता पोहोचून २०.१७ वाजता निघणार आहे. गाडी क्रमांक ०२८३४ हावडा-अहमदाबाद ही गाडी १६.११ वाजता आमगाव येथे पोहोचणार व १३.१३ वाजता निघणार, १६.४१ वाजता गोंदिया येथे येणार १६.४६ वाजता निघणार, तिरोडा येथे १७.०६ वाजता पोहचून १७.८ वाजता पुढील प्रवासासाठी निघणार. गाडी क्रमांक ०२८०९ मुंबई-हावडा विशेष रेल्वे १३.०८ वाजता गोंदिया येथे पोहचेल व १३.१३ वाजता निघणार. गाडी क्रमांक ०२८१० हावडा-मुंबई विशेष रेल्वे गोंदिया येथे १२.२ वाजता पोहोचून १२.४ वाजता निघणार. गाडी क्रमांक ०२०७० गोंदिया-रायगड जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी १५ वाजता गोंदिया येथून निघणार तर गाडी क्रमांक ०२०६९ रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी १३.२५ वाजता गोंदिया येथे पोहचेल.जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांनी या वेळापत्रकाची नोंद घ्यावी व त्यांच्या मूळ गावी पोहोचण्याकरीता वेळापत्रकानुसार पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून प्रवास करावा. सदर गाड्यांची तिकीटे फक्त आय. आर. सी.टी.सी च्या संकेतस्थळावर अथवा मोबाईल एॅप्सवर आॅनलाईन पद्धतीने ई-तिकीट स्वरूपात मिळतील. रेल्वे स्थानकावर कोणतीही तिकीटे उपलब्ध होणार नसल्यामुळे रेल्वे स्थानकावर अनावश्यक गर्दी टाळावी. ज्या प्रवाशांचे ई-तिकिट निश्चित झाले आहे. त्यांनाच रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवेश देण्यात येणार आहे. ज्यांची तिकीट निश्चित आहे. त्या प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या पूर्वी दीड ते दोन तास अगोदर रेल्वे स्थानकावर पोहचायचे आहे.सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंगप्रवासासाठी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रीनींग केली जाणार आहे. ज्या प्रवाशांमध्ये कोविड-१९ ची लक्षणे आढळणार नाही त्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांनी प्रवास करताना आपल्यासोबत कमीत कमी साहित्य घेऊन प्रवास करावा. तसेच सर्व प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक असून स्थानक आणि गाडीमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे.सर्व प्रवाशांनी शक्यतो आरोग्य सेतू अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावयाचा असून स्वत:चे भोजन व पाणी सोबत घ्यावे असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष डॉ.कादंबरी बलकवडे यांनी कळविले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे