शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आणखी २२ कोरोना बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:00 IST

गुरूवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये गोंदिया येथील ११, आमगाव तालुक्यातील २, गोरेगाव तालुक्यातील २, सडक अर्जुनी तालुक्यातील १ आणि तिरोडा तालुक्यातील ६ जणांचा समावेश आहे. गोंदिया व तिरोडा तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याने प्रशासन सुध्दा चिंतेत आहे. तिरोडा नगर परिषदेने कोरोनाचा साखळी खंडीत करण्यासाठी गुरूवारपासून तीन दिवस जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.

ठळक मुद्देकोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २०९ वर : २५० बाधितांची कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मागील पाच दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. सहा दिवसात जिल्ह्यात दोनशे कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.गुरूवारी (दि.६) पुन्हा २२ कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोना अ‍ॅक्टीव रूग्णांची संख्या २०९ वर पोहचली आहे. तर ४ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २५० वर पोहचली आहे.गुरूवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये गोंदिया येथील ११, आमगाव तालुक्यातील २, गोरेगाव तालुक्यातील २, सडक अर्जुनी तालुक्यातील १ आणि तिरोडा तालुक्यातील ६ जणांचा समावेश आहे. गोंदिया व तिरोडा तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याने प्रशासन सुध्दा चिंतेत आहे. तिरोडा नगर परिषदेने कोरोनाचा साखळी खंडीत करण्यासाठी गुरूवारपासून तीन दिवस जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. पहिल्याच दिवशी जनता कर्फ्यूला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तर गोंदिया शहरात सुध्दा रुग्ण वाढत असल्याने शनिवार आणि रविवारी दोन दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्याची प्रक्रिया प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली आहे.गुरूवारी याच विषयाला घेवून स्थानिक प्रशासन आणि व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. जिल्ह्यात दररोज कोरोना बांधितांची संख्या वाढत असताना मात्र प्रशासनाकडून उपाययोजना करण्यास मात्र कुचराई केली जात असल्याचे चित्र आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी सुध्दा स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच आपल्या समोरील व्यक्ती हा कोरोना बाधित आहे असे समजून स्वत:ची आपल्या कुटुंबांची काळजी घ्यावी.९७८४ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अुनषंगाने प्रयोगशाळेत आतापर्यंत एकूण १० हजार ४२० जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ४८६ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर ९ हजार ७८४ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. १४५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. तर १४३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. कोरोना बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट घेतली जात असून आतापर्यंत एकूण ३३१५ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ३२७९ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर ३४ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या