शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

व्यसन सोडा, शौचालय बनवा

By admin | Updated: November 22, 2015 01:59 IST

विष्ठेवर बसणाऱ्या माशा रोगांचा प्रसार करतात. घरात शौचालय असेल तर आजारापासून आपला बचाव होईल.

जि.प. अध्यक्ष मेंढे यांचे आवाहन : चुटीया येथे कार्यक्रम गोंदिया : विष्ठेवर बसणाऱ्या माशा रोगांचा प्रसार करतात. घरात शौचालय असेल तर आजारापासून आपला बचाव होईल. औषधांचा खर्च वाचेल. पुरूषांच्या तुलनेत घरातील महिला सर्वाधिक कामे करतात. त्याच्या आत्मसन्मानासाठी व्यसन सोडा आणि घरात शौचालय बनवा असे कळकळीचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी केले. गोंदिया तालुक्यातील चुटीया ग्रामपंचायतीत गुरूवारी (दि.१९) जागतिक शौचालय दिनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गावडे, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए.देशमुख, जिल्हा परिषद मग्रारोहयो विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन.एस. भांडारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे, चुटीयाचे उपसरपंच रामू शरणागत, ग्रा.पं. सदस्य महेश परसगाये, हरिलाल गराकाटे, बसंती राऊत, टीकेश्वरी पटले, निर्मला शरणागत, मुन्नालाल तुरकर उपस्थित होते. चुटीया येथील जागतिक शौचालय दिनाच्या या कार्यक्रमातून जिल्हा हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यात आले. मग्रारोहयोच्या माध्यमातून सुध्दा शौचालय बनविता येतात. मोडकळीस आलेल्या शौचालयाच्या बाबतीत शासनस्तरावर निर्णय होईलच. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, योजनांची माहिती घेण्यासाठी महिलांनी ग्रामसभेत उपस्थित रहावे, गावाच्या विकासात सहभाग घ्यावा, असेही जिल्हा परिषद अध्यक्षा उषा मेंढे म्हणाल्या. दूषित पाण्यामुळे अतिसार, डास होतात. पाणी उघड्यावरील विष्ठेमुळे दूषित होते. आजारापासून बचावासाठी प्रत्येक घरात शौचालय झाले पाहिजे. महिला पुरूषांची ती गरज आहे. शिवाय ऊन, वारा, पावसाच्या दिवसात ते सोयीचे आहे. गाव स्वच्छ सुंदर झाल्यास गाव नावारूपास येईल. त्यासाठी नियोजित कालावधीत शौचालयाचे बांधकाम करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी.गावडे यांनी केले. जागतिक शौचालय दिनाची गरज, महत्व यावर जिल्हा परिषद मग्रारोहयो विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन.एस. भांडारकर यांनी, शौचालय बांधकामाचे महत्व जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए.देशमुख यांनी विषद केले. माजी जि.प. सदस्य संजय टेंभरे यांनी गावाला हागणदारीमुक्त, स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा उषा मेंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी.गावडे यांनी गृहभेट करून डिब्बासिंग मुकुंदा वाढवे, उलासन बेनीराम वाढवे व रामदास मुुंकुंदा वाढवे यांच्या शौचालयाची पाहणी करून त्यांचा पुष्प देऊन सत्कार केला. शौचालयाचे बांधकाम करणाऱ्या कांता शहारे, देवनाथ येलसरे यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. संचालन देवानंद डोंगरे तर आभार ग्रामसेवक व्ही.बी. सूर्यवंशी यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)