शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चार महिन्यांत १९४० ‘सुकन्यां’चे खाते

By admin | Updated: May 2, 2015 01:44 IST

आपल्या चिमुकलीच्या शिक्षण व विवाहासाठी पैशांची सोय व्हावी या उद्देशातून केंद्र शासनाने ‘सुकन्या समृद्धी खाते’ योजना सुरू केली आहे.

गोंदिया : आपल्या चिमुकलीच्या शिक्षण व विवाहासाठी पैशांची सोय व्हावी या उद्देशातून केंद्र शासनाने ‘सुकन्या समृद्धी खाते’ योजना सुरू केली आहे. डाकघरांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या योजनेंतर्गत कमीत कमी एक हजार रूपयांत खाते उघडण्याची सोय आहे. मात्र जिल्ह्यात या योजनेला अत्यल्प प्रतिसाद लाभत असल्याचे दिसत येत आहे. यात आमगाव तालुका अग्रेसर असून तेथे ३६९ चिमुकलींचे खाते उघडण्यात आले आहेत.देशात आजही मुलीला शाप किंवा ओझे समजले जात आहे. यामुळेच पोटात मुलगी असल्याचे जाणून घेण्यासाठी तसेच मुलीचे भ्रूण असल्याचे कळताच तिला मारले जात आहे. एवढेच नव्हे तर मुलगी झाल्यास तिला लावारीस टाकण्यात येत असल्याचे प्रकारही उघडकीस येत आहे. परिणामी देशात मुलींच्या संख्येत झपाट्याने घट होत चालली आहे. ही एक गंभीर बाब निर्माण होत आहे. आजची मुलगी मुलापेक्षा कमी नसून याची कित्येक उदाहरणे पुढे आहेत. अनेक मुली आपल्या पालकांच्या पोषणकर्त्यांची भूमिका बजावत असल्याचेही कित्येक उदाहरण असून मुली शाप नसून एक वरदान ठरत आहेत. मुलगी होताच तिच्या शिक्षण व लग्नाची समस्या पालकांना भेडसावू लागते. मात्र मुलीच्या या खर्चांत शासनाकडून होतभार लावता यावा व पालकांचे टेंशन कमी करता यावे या उद्देशातून केंद्र शासनाने खास मुलींसाठी ‘सुकन्या समृद्धी खाते’ ही योजना सुरू केली. २२ जानेवारी २०१५ सुरू करण्यात आलेल्या या योजनेत परिपक्वतेत जमा रकमेवर भरघोस व्याज देऊन मुलीच्या शिक्षण व लग्नाची सोय केली जाते. विशेष म्हणजे या योजनेची तशी अट ठरवून देण्यात आली आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत ३० एप्रिलपर्यंत एक हजार ९१० खाते उघडण्यात आले आहेत. यात विशेष बाब म्हणजे आमगाव तालुका अग्रेसर असून येथे सर्वाधीक ३६९ खाते उघडण्यात आले आहे. तर अर्जुनी मोरगाव पोस्ट आॅफीसमध्ये ७६, देवरी पोस्ट आॅफीसमध्ये ८९, गोरेगाव पोस्ट आॅफीसमध्ये २३३, नवेगावबांध पोस्ट आॅफीसमध्ये १४, सडक अर्जुनी पोस्ट आॅफीसमध्ये ८७, सालेकसा पोस्ट आफीसमध्ये ८६, सौंदड पोस्ट आफीसमध्ये ७०, तिरोड पोस्ट आफीसमध्ये १११, गोंदिया बाजार पोस्ट आफीसमध्ये १९२, गोंदिया शहर (रेलटोली) पोस्ट आफीसमध्ये ३०३ तर गोंदिया मुख्यालयात २८० खाते उघडण्यात आले आहेत. (शहर प्रतिनिधी)