शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

देवरीच्या एफडीसीएम डेपोतील ८० बीट स्वाहा

By admin | Updated: April 25, 2017 00:45 IST

राष्ट्रीय महामार्ग-६ वर वनविकास महामंडळाचा डेपो आहे. या ठिकाणी गुरुवारी (दि.२०) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.

विद्युत तारांमुळे लागली आग : नुकसान फक्त एक लाख २० हजारांचे देवरी : राष्ट्रीय महामार्ग-६ वर वनविकास महामंडळाचा डेपो आहे. या ठिकाणी गुरुवारी (दि.२०) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत डेपोमध्ये ठेवलेल्या लाकडांपैकी जळाऊ लाकडे असलेले ८० बिट लाकडे जळून राख झाले. मात्र एवढ्या भिषण आगीत केवळ एक लाख २० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती वनविकास महामंडळाकडून (एफडीसीएम) देण्यात आली. देवरीच्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील वनउपज तपासणी नाक्याजवळ वनविकास महामंडळाचा (एफडीसीएम) डेपो आहे. या डेपोमध्ये दोन हजारच्या जवळपास लाकडांच्या बीट आणि दीड हजारच्या जवळपास बांबूचे बंडल ठेवले होते. गुरुवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास या डेपोतून गेलेल्या विद्युत वाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने त्या वाहिन्यांच्या जवळ लागून असलेल्या सागवानाच्या झाडाला आग लागली. सागवनाचे झाड एक ते दिड फूट जळाले. त्यानंतर सागवानाच्या जळालेल्या झाडाचा विस्तव खाली पडल्याने खाली असलेल्या पालापाचोळ्याने पेट घेतला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आग जोमात भडकली. वणवा लागून डेपोमध्ये ठेवलेल्या बिटांना आग जोमाने पकडली. ही आग वनमजूर व वनकर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी सुरूवातीला चार टँकर बोलावून पाणी मारले. जेसीबीच्या माध्यमातून माती खोदून इतर बिटांना आग लागणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात आले. या आगीत फक्त ८० बिट जळाऊ लाकडे जळाल्याची माहिती गोंदिया येथील वनविकास महामंडाळ गोंदिया कार्यालयात कार्यरत कर्मचारी बिसेन यांनी दिली. यात एक लाख २० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक पी.जी. नौकरकर, सहाय्यक व्यवस्थापक एस.टी. मेश्राम, देवरीचे वनपरीक्षेत्राधिकारी ए.एम. बडवाईक, ठाणेदार राजेश तटकरे व नगराध्यक्ष यांचे पती बिसेन यांनी घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी मदत केली. या डेपोमध्ये पाच लाखांचे लाकडांचे बिट होते असे सांगितले जाते. वेळीच उपाययोजना केल्यामुळे ते बिट वाचविण्यात त्यांना यश आले. नुकसानीचा खरा आकडा गुलदस्त्यात?वनविकास महामंडळाच्या देवरी डेपोला लागलेल्या आगीत ८० बिट लाकडे जळाल्याची माहिती विभागाने दिली. एवढ्या मोठ्या आगीत फक्त एक लाख २० हजार रूपयांचे नुकसान दाखविण्यात आले. परंतु सर्वसामान्य जनतेला हे नुकसान मोठे असल्याचे लक्षात येते. त्यामुळे आपले अपयश दिसू नये यासाठी वनविकास महामंडळ कमी नुकसान तर दाखवित नाही ना, अशी चर्चा आहे.