शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

७० टक्के व्यापार राहणार बंद

By admin | Updated: March 21, 2015 01:59 IST

समाजापेक्षा कुणीही मोठा नाही. तसेच समाज, धर्म व आराध्य देवाप्रती आपली श्रद्धा समर्पीत रहावी हे मुख्य ध्येय बाळगून येथील सिंधी ....

गोंदिया : समाजापेक्षा कुणीही मोठा नाही. तसेच समाज, धर्म व आराध्य देवाप्रती आपली श्रद्धा समर्पीत रहावी हे मुख्य ध्येय बाळगून येथील सिंधी पंचायतच्यावतीने आराध्य दैवत झुलेलाल चेट्रीचंड दिनानिमित्त शहरातील समस्त सिंधी समाजबांधवांनी आजच्या दिवशी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सिंधी समाजातील प्रमुख संस्था सिंधी नवयुवक मंडळाकडून आवाहन करण्यात आले असून समाजातील सर्व व्यापाऱ्यांच्या दुकानांत दुकान बंद ठेवली जाणार असल्याचे स्टिकर्स लावले आहेत. आजच्या युगात कुणालाही समाज व समाजबांधव वा आपल्या आराध्य देवी- देवतांसाठी वेळ उरलेला नाही. मॉडर्न म्हणविणाऱ्या या युगाची ही व्यथा आहे. फक्त पैसा कमविणे व आपल्या परिवारापुरते जीवन जगणे हे आजचे ध्येय राहिले आहे. अशात मात्र कधीतरी काही अडचण आल्यास पैशापेक्षा हा समाजच धावून येतो हे तेवढेच वास्तव्य आहे. हीच वास्तविकता आपल्या समाजबांधवांच्या नेहमी लक्षात रहावी यासाठी येथील सिंधी समाजाने एक वेगळीच युक्ती शोधली. त्याचे असे की, साई झुलेलाल सिंधी समाजाचे आराध्य दैवत असून त्यांचा जयंती दिवस सिंधी समाजासाठी अत्यंत अमूल्य दिवस असतो. माणूस त्या देवाच्या आशिर्वादानेच नाव, पैसा व मानसन्मान मिळवितो. असे असतानाही कित्येक जणं आपल्या देवा करिता एक दिवस देण्यासाठी पुढे येत नसतात. ही बाब लक्षात घेत सिंधी नवयुक मंडळाने झुलेलाल यांच्या जयंती दिनी एकही समाजबांधव आपले दुकान उघडणार नाही असे आवाहन केले आहे. मागील कित्येक वर्षांपासूनची ही परंपरा असून त्या दिवशी समाजबांधव समाजाच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन आपला हा दिवस देवाच्या सेवेत लावतात. शहरात आज प्रत्येक क्षेत्रात सुमारे ७० टक्के व्यापारी सिंधी समाजातले आहेत. त्यामुळे झुलेलाल जयंती उत्सव दिनी शहरातील सिंधी समाजबांधवांची सर्वच दुकाने बंद राहतील. (जिल्हा प्रतिनिधी)