शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी ७ नमुने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 05:00 IST

कोेरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. विशेष म्हणजे, कित्येकांना कोरोना संसर्ग असतानाही त्यांना काहीच जाणवत नाही. मात्र त्यांच्यातून कोरोनाचा संसर्ग होतो. यामुळे अशा रूग्णांनाही शोधून वेळीच त्यांच्यावर उपचार व अन्य आवश्यक उपाययोजना केल्यास ते कोरोना पसरवू शकणार नाही.

ठळक मुद्दे८ स्वॅब सेंटर सुरु : १२२ आरटी-पीसीआर तर ५८ अँटिजेनचे नमुने

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि बाधित व्यक्तींचा त्वरित शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने गोंदिया नगरपालिका क्षेत्रात ८ ठिकाणी अदानी फाउंडेशनच्या सहकार्याने आरटी-पीसीआर टेस्टींग सेंटर शनिवारपासून (दि.१९) सुरू केले आहे. या सेंटर्समध्ये पहिल्याच दिवशी १२२ आरटी-पीसीआर तर ५८ अँटिजेनचे नमुने घेण्यात आले असून त्याची अँटिडेनचे ७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.कोेरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. विशेष म्हणजे, कित्येकांना कोरोना संसर्ग असतानाही त्यांना काहीच जाणवत नाही. मात्र त्यांच्यातून कोरोनाचा संसर्ग होतो. यामुळे अशा रूग्णांनाही शोधून वेळीच त्यांच्यावर उपचार व अन्य आवश्यक उपाययोजना केल्यास ते कोरोना पसरवू शकणार नाही.अशात जास्तीतजास्त लोकांची टेस्ट करणे गरजेचे झाले असून शासनाचेही तसे आदेश आहेत. त्यातही आरटी-पीसीआर टेस्ट ही विश्वसनीय व तंतोतंत अहवाल देणारी टेस्ट असल्याने आता या त्यावरच जास्त भर दिला जात आहे.यातूनच शहरातील गणेशनगर, गोविंदपूर, मरारटोली, माताटोली, मालवीय स्कूल, रामनगर, कुंभारेनगर आणि सूर्याटोला परिसरातील नगर परिषदेच्या शाळांमध्ये हे सेंटर्स सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येकच भागात आता तपासणीची सोय झाल्याने नागरिकही तपासणीसाठी पुढे येत असल्याचे हे सेंटर्स सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी (दि.१९) दिसून आले. पहिल्याच दिवशी या सेंटर्समध्ये १८० नमुने घेण्यात आले.त्यात १२२ आरटी-पीसीआर आणि ५८ नमुने अँटिजेनचे घेण्यात आले. ५८ नमुन्यातील सात नमुने हे पॉझिटिव्ह आढळून आले आहे.जिनियस रिसोर्ट मधील सेंटर बंदआतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिनियस रिसोर्टमध्ये स्वॅब टेस्टींगची सोय होती. तपासणी केंद्राच्या कमतरतेमुळे तेथे नागरिकांची चांगलीच गर्दी होत होती. मात्र आता शहरातील प्रत्येकच भागात टेस्टींग सेंटर्स झाल्याने नागरिकांना सोयीचे होत आहे. अशात जिनियस रिसोर्टमधील टेस्टींग सेंटर बंद करण्यात आले आहे.नागरिकांनी सहकार्य करावेटेस्टींग सेंटर्सची संख्या वाढविण्यात आल्याने नागरिकांना नक्कीच सोय होणार आहे. मात्र टेस्टींगसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना चांगलीच लांबलचक प्रक्रीया करावी लागते. त्यात त्यांना पुष्कळ वेळ लागतो व त्यामुळे नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे. मात्र हे सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठीच असल्याने नागरिकांनी समजून घेत आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याची गरज आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या