शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेनंतर ६२ हजार १५५ मतदारांची भर

By admin | Updated: September 29, 2014 23:07 IST

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघांमध्ये ६२ हजार १५५ मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या आता १० लाख २२ हजार ७१५ झाली आहे.

गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघांमध्ये ६२ हजार १५५ मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या आता १० लाख २२ हजार ७१५ झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेल्या या मतदारांमध्ये सर्वाधिक वाढ गोंदिया मतदार संघात तर सर्वात कमी अर्जुनी मोरगाव मतदार संघात झाली आहे.वयाची १८ वर्षे पूर्ण झालेले युवक-युवती मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, याकरिता ८ जून ते ३० जूनदरम्यान प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात ५८ हजार ८ मतदारांची नव्याने नोंद झाली. त्यानंतर १ आॅगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीतही मतदारांची नोंदणी करून त्यांचे नाव विधानसभा निवडणुकीच्या यादीत टाकण्यात आले. यादरम्यान ४१४७ मतदारांची नव्याने नोंदणी झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी एन.के. लोणकर यांनी सांगितले. जिल्ह्यात अर्जुनी/मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आमगाव अशी एकूण चार विधानसभा क्षेत्रे आहेत. अर्जुनी/मोरगाव क्षेत्रात अर्जुनीसह सडक/अर्जुनी व गोरेगाव तालुका येतो. तिरोडा क्षेत्रात तिरोडासह गोंदिया व गोरेगाव तालुक्याच्या काही भाग येतो. गोंदिया क्षेत्रात फक्त गोंदिया तालुका तर आमगाव क्षेत्रात देवरी, सालेकसा व आमगाव तालुक्यांचा अंतर्भाव होतो. आता नव्याने समाविष्ट झालेल्या मतदारांच्या यादीनुसार अर्जुनी/मोरगाव क्षेत्रात २ लाख ३८ हजार ७९०, तिरोडा क्षेत्रात २ लाख ३९ हजार ३३६, गोंदिया क्षेत्रात २ लाख ९३ हजार ४४७ तर आमगाव क्षेत्रात २ लाख ५१ हजार १४२ मतदार झाले आहेत. जिल्ह्यात एकूण १ हजार २३० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. अर्जुनी/मोरगाव क्षेत्रात ३०५, तिरोडा क्षेत्रात २८८, गोंदिया क्षेत्रात ३३४ तर आमगाव क्षेत्रात ३०२ मतदान केंद्रातून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदान केंद्रातील व्यवस्था पार पाडण्यासाठी अर्जुनी/मोरगाव येथे ३०५, तिरोडा २८८, गोंदिया ३३५ तर आमगाव क्षेत्रात ३०२ असे एकूण १२३० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. सेना दलातील तब्बल १ हजार ६८३ मतदारही मतदानांचा हक्क पार पाडणार आहेत. अर्जुनी/मोरगाव क्षेत्रात पुरूष २०३, स्त्रिया ७४ असे एकूण २७७ सेना दलातील मतदार आहेत. तिरोडा क्षेत्रांतर्गत पुरुष २८७, स्त्रिया १५३ असे एकूण ६४०, गोंदिया क्षेत्रात पुरूष ३५६, स्त्रिया १०१ असे एकूण ४५७ तर आमगाव क्षेत्रात पुरूष २५१, स्त्रिया ५८ एकूण ३०९ असे एकूण १ हजार ६८३ सेना दलातील मतदार मतदान करणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)