शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

३९६ नामांकन छाननीत ठरले वैध

By admin | Updated: October 10, 2015 02:18 IST

चार नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुदतीअखेर ४६२ नामांकन दाखल झाले होते.

६६ कटले : १९ पर्यंत माघारीची मुदतगोंदिया : चार नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुदतीअखेर ४६२ नामांकन दाखल झाले होते. शुक्रवारी त्या अर्जांची छाननी केल्यानंतर ६६ अर्ज बाद झाले. त्यामुळे ३९६ अर्ज वैध ठरले आहे.वैध ठरलेल्या अर्जांचा विचार करता आता सर्वाधिक १२३ अर्ज देवरीत आहेत. येथे १२५ पैकी केवळ २ अर्ज बाद ठरले. अर्जुनी मोरगाव येथे १३१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ३६ बाद झाले तर काही उमेदवारांनी डबल अर्ज केले होते. त्यामुळे आता ९० उमेदवार पात्र ठरले आहेत. गोरेगाव येथे १११ पैकी १२ अर्ज बाद ठरून ९९ उमेदवार पात्र ठरले आहेत तर सडक अर्जुनी येथे ९५ पैकी ११ अर्ज बाद ठरल्याने ८४ उमेदवार निवडणूक लढण्यास पात्र ठरले आहेत.१९ आॅक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत आहे. यानंतर शिल्लक राहणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह देऊन अंतिमरित्या निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. (जिल्हा प्रतिनिधी)ढाब्यात आढळली दारू व रॉकेलगोंदिया : गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत गणखैरा परिसरात असलेल्या प्रेम ढाबा येथे एका डबकीत रॉकेल व अवैधरीत्या दारू साठवून ठेवणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सदर कारवाई गुरूवारच्या सायंकाळी ७.४५ वाजतादरम्यान परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक मंदार जवळे यांनी केली आहे. या प्रकरणात आरोपी लंकेश्वर रामदास सौंदरकर (२२) रा. पालेवाडा, अशोक चैनलाल दवारे रा. गोंदिया व परमेश्वर ऊर्फ प्रेम तुळशीराम कांबळे (३०) रा. गणखैरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्या ढाब्यामध्ये २४ नग देशी दारूचे पव्वे, मॅकडाल व्हिस्कीचे १४ पव्वे, रॉयल स्टगचे सहा पव्वे, व्हाईटमिस्चीपचे तीन पव्वे, हायबर्षचे नऊ नग, १८ देशी दारूच्या बॉटल, इतर विदेशी दारू व १४ लिटर रॉकेल जप्त करण्यात आले. आरोपींविरूध्द जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम ३,४ जीवनावश्यक वस्तू अधिनियम, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई ७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)